जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडसोबत सारा तेंडुलकरची पार्टी; संतापलेल्या अभिनेत्रीने उचललं हे पाऊल

जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडसोबत सारा तेंडुलकरची पार्टी; संतापलेल्या अभिनेत्रीने उचललं हे पाऊल

Janhvi Kapoor Unfollows Saara Tendulkar: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) शिखर पहारियासोबतच्या (Shikhar Pahariya ) तिच्या नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. ‘कॉफी विथ करण’ मध्ये (Koffee With Karan) अभिनेत्रीने त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.

सारा तेंडुलकरने शिखरसोबत पार्टी केली: काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) एका पार्टीनंतर जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडसोबत कारमधून निघताना दिसली होती. दोघांना एकत्र पाहून चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

रागाने लाल झालेल्या जान्हवीने हे पाऊल उचलले: आता बातम्या येत आहेत की, जान्हवी कपूरने साराला सोशल मीडियावर अनफ्रेंड केले आहे. दोघींनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचा दावा केला जात आहे. काही काळापूर्वी, अभिनेत्री साराला फॉलो करायची आणि तिचे फोटोही लाईक करायची. पण आता जान्हवीने सारापासून दुरावल्याचे दिसून येत आहे. मात्र, यामागचे नेमकं कारण काय आहे याची बरीच चर्चा रंगत आहे.

जान्हवी कपूरने तिच्या नात्याची कबुली दिली: नुकतचं जान्हवी कपूर तिची धाकटी बहीण खुशी कपूरसोबत कॉफी विथ करणमध्ये दिसली होती. यावेळी जेव्हा करण जोहरने प्रश्न विचारला तेव्हा तिने सांगितले की, जेव्हा ती दुसऱ्याला डेट करत होती, तेव्हा शिखर तिच्यासाठी ‘नादान परिंदे घर आजा’ गाायचा.

Vaani Kapoor : वाणी कपूरला लॉटरी लागली! अजय देवगणसोबत करणार स्क्रीन शेअर, म्हणाली…

जान्हवी कपूरचे आगामी चित्रपट: तिने शिखरचे खूप कौतुकही करत होती. शिखर सुरुवातीपासूनच माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे, असे अभिनेत्रीने सांगितले आहे. तो आमच्यासाठी एक भक्कम आधार आहे. शिखरला माझ्याकडून कधीच काही नको होतं. तो फक्त माझ्यासोबत होता. त्याने माझ्यावर कधीही दबाव आणला नाही.

जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे अनेक चित्रपट आहेत. लवकरच ती ज्युनियर एनटीआरसोबत साऊथ चित्रपट ‘देवरा’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातून ती साऊथमध्ये पदार्पण करणार आहे. शिवाय जान्हवी कपूर राजकुमार रावसोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’मध्येही दिसणार आहे, ज्याचे तिने शूटिंग पूर्ण केले आहे. एवढेच नाही तर जान्हवी टायगर श्रॉफसोबत ‘रॅम्बो’मध्येही दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज