Eknath Shinde Kolhapur Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज कोल्हापूर येथील गांधी मैदानात जाहीर सभा झाली. शिवसेनेचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरातील गांधी मैदानात जाहीर सभा घेतली. ही सभा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच मुख्यमंत्र्यांसह आयोजकांचा पुरता हेरमोड झाला. कारण मुख्यमंत्र्यांनी भाषण सुरू केल्यानंतर अवघ्या पाच ते सहा मिनिटात उपस्थित नागरिकांनी सभेतून काढता पाय घेतला.
Supriya Sule : माझ्यासारखा तगडा उमेदवार असेल तर कुठेही बसून चर्चा करेल; सुप्रिया सुळेंचं आव्हान
सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. आगामी लोकसभेसाठी सर्व जागा जिंकण्याचं ध्येय महायुतीचं आहे. त्यासाठी मुख्यममंत्री एकनाथ शिंदे हे राज्यभर प्रचार मेळावे घेत आहे. आज त्यांची कोल्हापूरात सभा झाली. या सभेसाठी कोल्हापुरातील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी जोरदार ताकद पणाला लावली होती. गांधी मैदान पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी कोल्हापूर मधील स्थानिक नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती.
दरम्यान, ही सभा सुरू झाल्यावर काही लोकांचे भाषणे झाली होती. ती भाषणे लोकांनी ऐकली. मात्र, मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच मुख्यमंत्र्यांसह आयोजकांचा पुरता हेरमोड झाला. कारण मुख्यमंत्र्यांनी भाषण सुरू केल्यानंतर अवघ्या पाच ते सहा मिनिटात उपस्थित नागरिकांनी काढता पाय घेतला. त्यामुळं खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या.
नागरिक सभास्थळ सोडायला लागल्याने आयोजक समितीतील कार्यकर्ते नागरिकांना थांबण्याची विनंती करत होते. मात्र उपस्थित त्यांनी कोणाची विनंती न जुमानता मैदान सोडणे पसंत केले. त्यामुळे राष्ट्रीय अधिवेशनात नवी ऊर्जा मिळाल्याच्या बाता करणाऱ्या शिंदेच्या शिवसेना नेत्यांना कोल्हापूर मधील गांधी मैदानातील सभेमुळे जोरदार झटका बसला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी भावना शिवसेनेकडून व्यक्त होत आहे. तसे झाले तर विधानसभेसाठी राज्यातील आणि कोल्हापूरचे किती आमदार शिंदे यांच्या मागे असतील, यावर सारे गणित अवलंबून राहणार आहे. महायुतीच्या जागावाटपात कोल्हापुरात दोन जागा वाटप होण्याची शक्यता आहे. येथेही महाविकास आघाडीचे कडवे आव्हान असल्याने विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून फारसे यश मिळेल, असे सध्या तरी दिसत नाही. आता तर खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सभेतून नागरिकांना काढता पाय घेतला, त्यामुळ सध्या तरी कोल्हापूरकडे शिंदेसोबत नसल्याचं दिसतं.
मुख्यमंत्री शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
या सभेला संबोधित करतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांना आपला पंतप्रधान पदाचा उमेदवारी ठरवता आला नाही. त्यामुळे त्यांच्या आघाडीतून देखील एक एक करून सगळे सोडून जात आहेत.