CM Eknath Shinde Sabha For Yogesh Kadam In Dapoli : विधानसभेच्या रणधुमाळीत प्रचाराचे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचार सभांना वेग आलाय. आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी पक्षश्रेष्ठी मैदानात उतरले आहेत. महायुतीचे उमेदवार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची (CM Eknath Shinde) जाहीर सभा झाली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, दापोलीच्या या संपन्न भूमित बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक योगेश कदम हातात भगवा झंडा घेवून उभा आहे.
शिवाजीराव कर्डिले यांची ताकद वाढली; अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाने दिला जाहीर पाठिंबा
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, योगेश कदम यांचा विजय पक्का आहे. 23 तारखेला गुलाल उधळायचा, फटाके फोडायचे, आनंदाचा उत्सव साजरा करायचा. दापोलीत विकासाची गंगा आणायची, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले (Assembly Election 2024) आहेत. सावत्र भावांना, तुमच्या योजनेत खोडा दाखवणाऱ्या भावांना या निवडणुकीत खोडा दाखवण्याची गरज आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. लाडक्या भावांच्या योजना आणली. कोकण शिवसेना प्रमुखांवर प्रेम करणारी जनता आहे. कोकणची माणसं साधीभोळी आहेत, पण त्यांच्या काळजात शहाळी असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
आमच्या योगेश कदमच्या डोक्यावर बर्फ आहे. तो शांतपणे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केव्हा करेल, ते विरोधकांना देखील समजणार नाही असं भरसभेत एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. ही देणा बॅंक आहे, लेणा बॅंक नाही असं वक्तव्य एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. सभेत बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर टीका केलीय. आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे, शब्द द्या, पण शब्द देताना हजार वेळा विचार करा. मतदान झाल्यानंतर लगेच खात्यात योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे पडणार आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
तुम्ही एकनाथ शिंदेला हलक्यात घेतलं म्हणून तुमचं सरकार टांगापलटी झालं, अशी टीका झाली. मागच्या निवडणुकीत जनतेने विश्वासाने भाजप-शिवसेनेला मतदान केलं होतं. त्यांच्याशी दगाबाजी केली, अशी टीका शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केलीय. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना, विचार पुढे घेवून जात आहोत. त्यामुळेच लोकसभेत तुम्हाला कोकणच्या जनतेनं नाकारलं. तुमचा एकही उमेदवार निवडून आला नाही, अशी टीका देखील शिंदेंनी केलीय.