Eknath Shinde On Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकार आकडता हात घेणार नसल्याचा शब्दच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असून मनोज जरांगे यांची पदयात्रा आता नवी मुंबईत दाखल झाली आहे. जरांगे यांनी आंदोलन न करण्यासाठी सरकारकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले असून सरकारच्या प्रयत्नांना अपयश आलं आहे. अशातच आता पुन्हा एकदा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला शब्दच दिला आहे.
मोठी बातमी! मुंबई पोलिसांनी जरांगेंना आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी नाकारली
मुख्यमंत्री म्हणाले, सध्या मराठा आरक्षणाबाबत आमची मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. ही चर्चा सकारात्मक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार हात आकडता घेणार नाही. आम्ही शिंदे समितीच्या अहवालानूसार कुणबीचे दाखले देत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं आहे. तसेच सरकारने आत्तापर्यंत मराठा समाजाला नूसतं आश्वासनच नाहीतर थेट आरक्षण देण्यासाठीचे निर्णय घेतलेले आहेत. मराठा समाजाला आम्ही सोयीसुविधा देण्यासाठी हात आकडता ठेवणार नसून आरक्षण देण्यावर सरकार ठाम असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.
तब्बल 2 किलो सोनं, 40 लाख कॅश; तेलंगणात सरकारी अधिकाऱ्याच्या घरात 100 कोटींचं घबाड!
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणानंतर आता पदयात्रेचं हत्यार उपसलं आहे. मागील काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी लाखो मराठा बांधवांसह अंतरवली सराटीतून पदयात्रा काढली असून ही पदयात्रा मुंबईत धडकणार आहे. या पदयात्रेला राज्यभरातील मराठा समाजबांधवांकडून प्रतिसाद मिळत असून मराठा समाजाकडून जरांगे यांच्या मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
अयोध्येतील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जमीन अदानी समुहाला विकली? भाजप नेत्याच्या कंपनीचे कनेक्शन उघड
अंतरवली सराटीतून निघालेली ही पदयात्रा अहमदनगर, पुणे मार्गे मुंबईत धडकणार आहे. आज सकाळच्या सुमारास मनोज जरांगेंची पदयात्रा लोणावळ्यात होती. याचदरम्यान, पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील चांगलेच कोंडीत सापडले आहेत. पोलिसांकडून त्यांना खारघर येथील मोठं मैदानात आंदोलन करण्याबाबत पोलिसांकडून सुचवण्यात आले आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलनासाठी ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे.