‘शिवरायांची शपथ घेऊन सांगतो..,’; CM शिंदेंनी मराठा समाजाला ठणकावून सांगितलं

Cm Eknath Shinde speak on Maratha Reservation : शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मी मराठा आरक्षण देणारच, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला ठणकावूनच सांगितलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आमरण उपोषणानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत संपली. त्यानंतर पुन्हा जरांगेंनी उपोषणाचं हत्यार उपसलं. त्यानंतर […]

Cm Eknath

Cm Eknath

Cm Eknath Shinde speak on Maratha Reservation : शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मी मराठा आरक्षण देणारच, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला ठणकावूनच सांगितलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आमरण उपोषणानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत संपली. त्यानंतर पुन्हा जरांगेंनी उपोषणाचं हत्यार उपसलं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी दसरा मेळाव्यात बोलताना शपथ घेऊनच आरक्षण देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Maratha Reservation : गद्दारी करण्याचा चान्स होता पण… जरांगेंचं चौंडीत भावनिक आवाहन

मुख्यमंत्री म्हणाले, शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की मी मराठा आरक्षण देणारच. राज्यातील कोणत्याही समाजबांधवांवर अन्याय न करता, कुणाचंही आरक्षण काढून न घेता, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण सरकार देणार म्हणजे देणारच. एकनाथ शिंदेंच्या रक्तात शेवटचा थेंब असेपर्यंत मी मराठा समाजासाठी लढणार, सर्व समाजबांधव आपलेच असल्याचंही मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री झरीन खानकडून दसऱ्याचा खास संदेश; इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धावरुन चिंता…

मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने, शपथ घेऊन, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सांगतो. मी मराठा समाजाला आरक्षण देणार, असल्याचंही ते म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यात आरक्षणासाठी मनोज जरांगे हे राज्यातील ठीक ठिकाणी सभा घेत आहे.

Ajit Pawar : फडणवीसचं हुकमी एक्का; मंत्रिमंडळ विस्तारावर बोलतांना अजितदादांची कबुली

आरक्षणासंदर्भात जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम आज संपला असून उद्यापासून पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात यांनी रणशिंग फुंकले आहे. आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत सरकारला जेरीस आणून सोडणार मनोज जरांगे यांनी चौंडी येथे दिला आहे.

आरक्षणासाठी आतापर्यंत केवळ आश्वासन देण्यात आले जे सत्तेत नाही त्या आरक्षण देण्याचा आश्वासन देतात ते सत्तेत आले व दुसरे सरकार पडलं सरकार पुन्हा आम्ही आरक्षण मिळवून देऊ आम्हाला सत्ता द्या अशी मागणी करतात. मात्र घोषणा देऊन भाषणे देऊन नाही तर त्यासाठी लढा द्यावाच लागणार, असल्याचं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version