Download App

‘त्या’ प्रकरणी अतुल भातखळकरांविरूद्ध कॉंग्रेस आक्रमक, गुन्हा दाखल करून अटकेची मागणी

Congress नेते धनंजय शिंदे यांनी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्याविरोधात दादर पोलीस स्थानकात दिली आहे.

Congress aggressive against Atul Bhatkhalkar for post of religious divisions and defames the Congress party : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी X (पूर्वीचे ट्वीटर) या सोशल प्लॅटफॉर्मवर केलेले ट्विट अत्यंत द्वेषपूर्ण, धार्मिक तेढ निर्माण करणारे आणि काँग्रेस पक्षाची व कार्यकर्त्यांची बदनामी करणारे आहे. सदर ट्विटमुळे समाजात वैरभावना आणि अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी लेखी तक्रार काँग्रेस नेते धनंजय शिंदे यांनी दादर पोलीस स्थानकात दिली आहे.

पाहिले युतीच्या बाता अन् आता हात आखडता; एकत्र येण्याबाबत राज ठाकरे यांचे घूमजाव

या संदर्भात बोलताना शिंदे म्हणाले की, अतुल भातखळकर हे एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत पण त्यांचे वागणे हे सातत्याने बेजबाबदारपणाचे राहिले आहे. ते आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरून साततत्याने द्वेष पसरवण्याचे व धार्मिक तेढ करणा-या पोस्ट करतात. त्यांच्या या कृत्यामुळे सामाजिक शांतता भंग पावण्याची दाट शक्यताच आहे.

धार्मिक किंवा सामाजिक गटांमध्ये तेढ निर्माण करणे. वैरभावना किंवा सार्वजनिक तेढ निर्माण करणारी विधाने. शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान. बदनामी करणे. ऑनलाइन बदनामीकारक किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारा मजकूर.या कलमाखाली गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली पाहिजे असे शिंदे म्हणाले.

भुजबळांच्या दालनात कुणाचे फोटो? पत्रकाराचा प्रश्न अन् भुजबळांचं मन जिंकणारं उत्तर

यापूर्वी काँग्रेस पक्षाने अर्णव गोस्वामी (पालघर प्रकरण, २०२०) आणि अमित मालवीय यांच्याविरोधात अशाच खोट्या आणि बदनामीकारक मजकुरासाठी तक्रारी दाखल केल्या आहेत, ज्याचा आदर्श येथे लागू होतो. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कारवाई करून सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंतीही शिंदे यांनी दादर पोलिसांना केली आहे.

काय म्हणाले होते अतुल भातखळकर?

अतुल भातखळकर यांनी एक एक्स पोस्ट केली होती. त्यामध्ये त्या म्हणाले होते की, देशातील काँग्रेस नावाच्या मुस्लिम लीगला ऑपरेशन सिंदूर ही मामुली घटना वाटते. हा त्यांचा दोष नाहीये. काँग्रेसवाल्यांचे मेंदू बहुदा पाकिस्तानातून नियंत्रित केले जातात.

follow us