Ashok Chavan Resignation: राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. (Maharashtra Politics) तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघात झालेल्या चर्चेची माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही. मात्र, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे राजीनाम पत्र #ashokchavan #MaharashtraPolitics #CongressParty #BJP4IND #nanapatole #DevendraFadnavis pic.twitter.com/EPar2UvwXy
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) February 12, 2024
पत्रात नेमकं काय?
महोदय, मी दिनांक १२/०२/२०२४ मध्यान्हानंतर पासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याव्दारे सादर करीत आहे. धन्यवाद.. आपला विश्वासू, असे तपशीलमध्ये लिहल्याचे दिसत आहे.
अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघांमध्य झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. परंतु, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
काँग्रेसचे काही नेते आमच्या संपर्कात असून ते आमच्याबरोबर येण्यास तयार असल्याचे भाजपचे नेते सांगतात. काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हेही संपर्कात असल्याचे अनेकदा भाजप नेत्यांकडून सांगितले. अशोक चव्हाण हे भाजपमधील येतील, असा दावा नांदेडचे भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. अशोक चव्हाण यांनी चिखलीकरांचा दावा खोडून काढला होता. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सोलापूर दौऱ्यावर अशोक चव्हाण यांच्याबाबत थेट भूमिकाच जाहीर करून टाकली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये महाभूकंप; अशोक चव्हाणांकडून आमदारकीचा राजीनामा?
तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांचा फोन नॉटरिचेबल असल्याचेदेखील सांगितले जात आहे. तर, दुसरीकडे भाजपकडून आज काही पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम अतिशय गुप्त ठेवण्यात आला होता. त्याशिवाय आज एकम महत्त्वाची पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, आशिष शेलार या परिषदेला उपस्थित राहणार असल्याचा मेसेज भाजपकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर काही माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असे सांगितले जात होते. मात्र, आता काँग्रेसचा बडानेता भाजपमध्ये प्रवेश करू शकतो अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यात चव्हाणांनी नार्वेकरांची भेट घेऊन आमदाराकीचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. आता चव्हाणांसोबत कोण कोण नेते भाजपात प्रवेश करणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.