MVA Seat Sharing Issue : राज्यात विधानसभा निवडणुकीची राजकीय रणधुमाळी चांगलीच रंगलेली आहे. महायुतीचं जागावाटप निश्चित झालंय. भाजपने पहिलीच 99 जागांची पहिली यादी जाहीर केलीय. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने पाच याद्या जाहीर केलेल्या आहेत. तर मनसेने देखील आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष महाविकास आघाडीच्या जागावाटपाकडे (MVA Seat Sharing) लागलंय. यासंदर्भात मविआची महत्वाची बैठक होत आहे. यावर आता कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई (Anil Desai) यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मी कॉंग्रेसचा प्रतिनिधी म्हणून भेटलेलो आहे. पवार साहेबांशी देखील चर्चा झालीय. आता थोड्याच गोष्टींवर चर्चा बाकी आहे. त्यामुळे फार काही अडचण वाटत नाही. आम्ही एकत्र बसून बैठकीला जात आहोत, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिलीय. ज्या जागा शिल्लक आहेत. त्या जागांवर आपला उमेदवार दिला जावा, असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे हा वादाचा विषय नसून चर्चेचा विषय आहे.
यादी नाही थेट शरद पवारांकडून एबी फॉर्मचं वाटप, पारनेरमध्ये शिवसेनेला धक्का देत राणी लंकेंना संधी
मी महाविकास आघाडीच्या बैठकीला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये काय आहे? पवार साहेबांना काय वाटतं? याविषयी सगळं समजून घेतलेलं आहे. यावर आता एकत्र बसून मार्ग काढू. फार थोड्या जागांवर चर्चा करणार आहे, असं थोरातांनी म्हटलंय. लवकरच पहिल्या उमेदवाराची घोषणा होईल, असं थोरात म्हणाले आहे. २४ तारखेला शुभ योग आहे, त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांना असं वाटतंय की, 24 तारखेला अर्ज भरावा.
आईच्या पराभवाचा वचपा काढला आणि पहिल्याच टर्मला मंत्री; प्राजक्त तनपुरेंचा राजकीय प्रवास
ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई म्हणाले की, आज दुपारी महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र येणार आहेत. ज्या काही थोड्या जागा राहिल्या आहेत. सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास अनिल देसाई यांनी व्यक्त केलाय. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी होईल. उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल, असं देसाई म्हणाले आहेत. मुंबईच्या कोणत्याही जागांवर वाद नसल्याचं त्यांनी म्हटलंय.