Balasaheb Thorat : विजयानंतर ज्यांनी फटाके वाजवले, त्यांनी नंतर घरात गेल्यावर माझ्या कष्टाचं पाणी पिले असल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विरोधकांवर निशाणा साधलायं. संगमनेर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पराभवानंतर बाळासाहेब थोरात पहिल्यांदाच व्यासपीठावर आले होते. संगमनेरात त्यांनी स्नेह मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी आजतागात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखाच मांडला आहे.
कुणाचं नाक तुटलं तर कुणाचा डोळा दुखावला..घातक दुखापतींमुळे ‘या’ दिग्गजांचं क्रिकेट थांबलं
बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर विजयानंतर ज्यांनी फटाके वाजवले, नंतर घरात गेल्यावर त्यांनी पिलेलं पाणी हे आपल्या कष्टामुळेच आलंय, त्यांनी घराच जे खाल्ल असेल ते आम्ही मेहनत करुन आणलेल्या पाण्यावरच शिजवलयं. घासाबरोबर काही आठवणी काढा, थोडी तरी कृतज्ञता, संवदेना ठेवली पाहिजे. देशात लोकशाही आहे, लोकं इकडं तिकडं मते देऊ शकतात पण जे केलं ते मान्य करण्याची दानत ठेवली पाहिजे ती काही लोकांमध्ये दिसत नसल्याचा टोलाही बाळासाहेब थोरातांनी विरोधकांना लगावलायं.
शिंदे अलर्ट मोडवर, पवार दिल्लीला तर शाह चंदिगढला रवाना; महायुतीत नेमकं चाललंय काय?
तसेच आता निळवंडेचं अनेकजण श्रेय घेत आहेत. निळवंडेचं पाणी आम्ही कसं सोडलं असं म्हणणाऱ्यांचा सहवास काय हा प्रश्न आहे. निळवंडेसाठी अनेक अडचणी होत्या. भूसंपादनासाठी अनेक आंदोलने झाली. प्रश्न सोडवण्यासाठी अनेकदा बैठका कराव्या लागायच्या. त्यावेळी कायदा होता की लाभ क्षेत्रातल्या जमीनी आठ एकराच्या वरच्या काढून घ्या आणि त्या त्यांना द्या पण आम्ही सरकारी जमिनीवर पुनर्वसन केलं. आठ एकराच्या जमीनी शेतकऱ्याकडेच ठेवल्या, सातबाऱ्यावरुन शेरा काढून टाकला, शेतकऱ्याचं जीवन उभं राहण्याचं काम आम्ही केलं असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलंय.
पराभवानंतर दोष निश्चितपणे दूर करण्याचा प्रयत्न करणार असून मागील साडेसतरा वर्षांत मी कृषी, शिक्षण जलसंधारण, नागपूरचा पालकमंत्री, महसूलमंत्री अशा अनेक पदांवर काम केलंय. संगमनेर तालुक्यात एक लाख शेततळे करण्याचा कार्यक्रम मी राबवलायं, गुगलवर सर्च करुन पाहा, झूम करुन पाहा, ऑनलाईन सातबारा आणण्याचं काम मी केलं, जुने कागदं, फेरफार आता ऑनलाईन मिळत असल्याची आठवणही बाळासाहेब थोरात यांनी करुन दिलीयं.