कुणाचं नाक तुटलं तर कुणाचा डोळा दुखावला..घातक दुखापतींमुळे ‘या’ दिग्गजांचं क्रिकेट थांबलं

कुणाचं नाक तुटलं तर कुणाचा डोळा दुखावला..घातक दुखापतींमुळे ‘या’ दिग्गजांचं क्रिकेट थांबलं

Biggest Injury in Cricket : क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले आहेत. अनेकांनी क्रिकेट गाजवलं. प्रेक्षकांनाही अभिमान वाटेल अशी कामगिरी केली. त्यामुळे हे खेळाडू जेव्हा क्रिकेटमधून निवृत्त झाले तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हुरहूर वाटली. आजही या खेळाडूंचं नाव क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात आहे. पण, असेही काही क्रिकेटपटू आहेत. ज्यांचं करिअर दुखापतीनं थांबवलं तर एक खेळाडू असा होता की ज्याला प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा उसळता चेंडू लागून त्याने जगाचाच निरोप घेतला. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच पाच खेळाडूंची माहिती घेऊन आलो आहोत.  

उसळत्या चेंडूने घेतला बळी

फिल ह्यूज या खेळाडूला काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया क्रिकेटच भविष्य (Cricket Australia) म्हटलं जातं होतं. पण ते काही होऊ शकलं नाही. लहानशा कारकीर्दीत ह्यूजने चमकदार कामगिरी केली होती. एका सामन्यात सीन एबॉटचा एक बाऊंसर चेंडू ह्यूज साठी प्राणघातक ठरला. हा चेंडू त्याच्या डोक्याला जोरात लागला आणि ह्यूज मैदानातच कोसळला. तीन दिवस कोमात राहिल्यानंतर वाढदिवसाच्या तीन दिवस आधीच त्याचा मृत्यू झाला.

बेल्स उडाली अ्न बाऊचरचा डोळा जायबंदी

दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज विकेटकिपर मार्क बाऊचरचं क्रिकेट (Mark Boucher) करिअर सुद्धा एका दुखापतीने संपवलं. 2012 मध्ये बाऊचर स्टंपमागे मोठं रेकॉर्ड करील अशी स्थिती होती. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात हे रेकॉर्ड करण्याची संधी चालून आली होती. परंतु याआधी सराव करत (South Africa) असताना फिरकी गोलंदाज इम्रान ताहीरची गुगली त्याच्यासाठी त्रासदायक ठरली. गुगली चेंडू आधी स्टंपवरील बेल्स वर आदळला नंतर बेल्स उडून मार्क बाऊचरच्या डोळ्याला लागली. या दुखापतीनंतर बाऊचरला क्रिकेटमधून निवृत्तीच जाहीर करावी लागली.

ICC च्या अध्यक्षपदाची धूरा जय शाहांच्या हाती, पदभार स्वीकारताच काय म्हणाले?

जॉन्सनच्या गोलंदाजीचा ट्रॉटला धसका

इंग्लंडचा स्टार फलंदाज जोनाथन ट्रॉट क्रिकेट विश्वात (Jonathan Trott) नावाजला जात होता. पण याच काळात वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने त्याला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करून टाकलं होतं. जॉन्सनच्या भेदक गोलंदाजीमुळे ट्रॉटला अॅशेज मालिका अर्ध्यावरच सोडावी लागली होती. नंतर त्याने वापसी केली पण यावेळी त्याचा आधीच अंदाज हरवला होता. 2015 मध्ये जोनाथन ट्रॉटने क्रिकेटमधूनच निवृत्ती जाहीर केली.

चुकीच्या उपचाराने थांबलं ब्रेकनचं क्रिकेट

लांब केसांमुळे चर्चेत आलेला ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नॅथन ब्रेकन तुम्हाला (Nathan Bracken) आठवत असेलच. ब्रेकनने आपल्या गोलंदाजीने मोठ्या फलंदाजांना घाम फोडला होता. 2009 मध्ये त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि उपचार सुरू करण्यात आले. पण डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे त्याचं क्रिकेट करिअरच धोक्यात सापडलं. यामुळे ऑस्ट्रेलियाला (Australia) चांगला गोलंदाज गमवावा लागला.

तोंडाच्या दुखापतीने क्रिकेट थांबलं

सन 2020 मधील टी 20 वर्ल्डकप स्पर्धेतील फायनल सामना. या सामन्याचा हिरो ठरला होता इंग्लंडचा क्रेग कीसवेटर. यानंतर क्रेगला (Chris Kieswetter) इंग्लंड क्रिकेटच भविष्य म्हटलं जात होतं. पण काउंटी क्रिकेटमधील एका सामन्यात एक चेंडू त्याच्या हेल्मेटला लागून त्याच्या तोंडावर जोरात आदळला. हा दणका इतका जोराचा होता की क्रेगचं नाक तुटलं. या दुखापतीमुळे पाच वर्षांतच त्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube