Nana Patole : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत आज रविवारी (25 ऑगस्ट) जळगावमध्ये (Jalgaon) लखपती दीदींचा (Lakhpati Didi मेळावा संपन्न झाला. जळगाव विमानतळ परिसरात हा कार्यक्रम झाला. 100 एकर जागेमध्ये मोदींच्या लखपती दीदी कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. दरम्यान, याच वरून कॉंग्रेस प्रदेशाध्य नाना पटोलेंनी (Nana Patole) मोदी सरकावर जोरदार टीका केली.
राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शिंदे सरकारचा मोठा निर्णय, लागू होणार सुधारित पेन्शन योजना
जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा नेपाळमध्ये मृत्यू झाला. त्याची संवेदना म्हणून भाजपकडून मोदींचा दौरा रद्द करण्याची गरज होती, मोदींच्या रुपाने देशातील जनतेने सर्वात असंवेदनशील पंतप्रधान पाहिलाय, अशी टीका पटोलेंनी केली.
नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, जळगावमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लखपती दिदी कार्यक्रम संपन्न झाला. याविषयी विचारले असता पटोले म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील तीर्थयात्रेसाठी गेलेल्या श्रद्धाळूंचा अपघातात नेपाळ येथे मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह आज जळगावात दाखल झालेत. मात्र, थोडीशी तरी माणुसकी असती तर भाजपने आणि पंतप्रधानांनी आजचा कार्यक्रम रद्द केला असता. एकीकडे लोकांच्या डोळ्यात अश्रू तर दुसरीकडे हे उत्साह साजरा करत आहेत. मोदींच्या रुपाने देशातील जनतेने सर्वात असंवेदनशील पंतप्रधान पाहिलाय, अशी टीका पटोलेंनी केली.
फडणवीसांनी हात वर केलेत, महायुतीमध्ये महाभारत चाललंय, पुढच्या महिन्यात…; पटोलेंचा मोठा दावा
हा कार्यक्रम जनतेच्या पैशातून केला जातोय. हा सरकारी कार्यक्रम आहे. एकीकडे महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि दुसरीकडे त्यांच्यात पैशाने कार्यक्रम घेऊन सरकार मीठ चोळत आहेत का? असा सवाल पटोले यांनी केला.
पुढं ते म्हणाले, महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत चाललेले नाही. महायुतीमध्ये महाभारत चाललेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हात वर केले आहेत. महायुतीमध्ये मोठी गडबड सुरू आहे. पुढच्या महिन्यात महायुतीमध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं अंदाज पटोलेंनी व्यक्त केला.
निवडणुका घ्यायला घाबरत आहेत…
निवडणुका कधी लागतील हे सांगता येत नाही. निवडणूक आयोग भाजप कार्यालया बसल्याचे चित्र आहे. लाल किल्ल्यावरून भाषण करताना मोदी म्हणत होते, वन नेशन, वन इलेक्शन आणायचा आहे. मात्र, देशातील चार राज्यातील निवडणुका देखील घ्यायला ते घाबरत आहेत, असा टोला पटोलेंनी लगावला.