Nana Patole on Devendra Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Shinde) मराठा आरक्षण (Maratha Reservation) द्यायचं आहे, पण देवेंद्र फडणवीस जाणूनबुजून आरक्षण मिळू देत नाहीत, अशी टीका मनोज जरांगेंनी केली. त्यावर आता त्यावर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) प्रतिक्रिया दिली.
Rohit Arya : मंत्री केसरकरांविरोधात महिनाभर उपोषण करणाऱ्या तरुणाला रस्त्यावरच आली फिट…
मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांचा अडथळा आहे, या मनोज जरांगे पाटलांच्या विधानात तथ्य असल्याचं पटोले म्हणाले.
टिळक भवनात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांचा अडथळा आहे, या मनोज जरांगे पाटलांच्या विधानात तथ्य आहे. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राणे आयोग नियुक्त करून मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र त्या आरक्षणाविरोधात फडणवीस यांच्या निकटवर्तीयांनीच न्यायालयात धाव घेतली, असं पटोले म्हणाले.
फडणवीस आज जे बोलले ते साफ खोटं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासाठी कोणताही निर्णय घेत असतील आणि मी त्याला विरोध केला असेल तर पदाचा राजीनामा देईल, असं फडणवीस म्हणाले. त्याविषयी विचारल असता पटोले म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी कोर्टात बाजू मांडू नका, असं फडणवीस यांनीच सांगितल्याचे महाधिवक्ते आशितोष कुंभकोणी यांनीही जाहीरपणे सांगितलं होते, फडणवीसांचे निकटवर्तीय गुणरत्न सदावर्ते हे ही आरक्षणाविरोधात कोर्टात गेले होते. त्यामुळं आरक्षणप्रश्नी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जे बोलले ते साफ खोटं आहे आहे, असं पटोले म्हणाले.
भाजप आरक्षणाचा मुद्दा चिघळत ठेवतंय…
आरक्षणाचा मुद्दा चिघळत ठेऊन सत्ता भोगायची या ब्रिटीशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ नितीने भाजप काम करत आहे. फडणवीस सरकारने गायकवाड आयोग नेमला होता, त्यावर कोर्टाने ताशेरे मारले होते. फडणवीस सरकार असतांना मराठा आरक्षणाचा ठराव विधानसभेतही मंजूर झाला, मात्र नंतर ते कोर्टात टिकू शकलं नाही. सरकार जो निर्णय घेईल त्याला विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे. हे विरोधी पक्षांनी स्पष्ट केलेलं असतांनाही शिंदे सरकार विरोधकांवरच आरोप करत आहे, हे चुकीचे आहे, असं पटोले म्हणाले.