Prithviraj Chavan : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) खुर्ची डळमळीत असून वाजपेयी सरकारच्या 13 महिन्यांच्या सरकारची पुनरावृत्ती होईल, असा दावा चव्हाण यांनी केली.
दौंडमधून शरद पवारांचा नवा भिडू मैदानात, डॉ.भरत खळदकर यांना विधानसभेसाठी संधी?
गोंदियाचे माजी आमदार आणि भाजप नेते गोपाल अग्रवाल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत विदर्भातील जनतेने काँग्रेस-मविआला चांगली साथ दिली. विधानसभा निवडणुकीत यापेक्षाही चांगलं साथ देतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या भापज, महायुती सरकारला घालवण्याशिवाय जनता शांत बसणार नाही. विधानसभा निवडणुकीत महायुती 100 जागाही मिळणार नाहीत. तसेच मोदी सरकारची खुर्चीही डळमळीत झाली आहे. वाजपेयी सरकारच्या 13 महिन्यांच्या सरकारची लवकरच पुनरावृत्ती होईल, असा दावा चव्हाण यांनी केली.
Ganpati Bappa Visarjan : भव्य विसर्जन मिरवणुकीने काश्मीरमधील सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता
तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजप सरकार बहिणींच्या साडीवर 18 टक्के जीएसटी लावून लुटले आणि 1500 रुपये देते. भाजप बजरंग बलीच्या नावाने, श्रीरामाच्या नावाने मते मागते. पण लोकसभा निवडणुकीत त्यांना श्रीरामही पावले नाही आणि बजरंग बलीही पावले नाहीत.
काँग्रेस पक्ष 100 हून अधिक जागा जिंकेल
पुढं बोलतांना ते म्हणाले, जेव्हा-जेव्हा विदर्भात काँग्रेसला पाठिंबा मिळतो, त्यावेळेस राज्यात काँग्रेसची सत्ता येते. विदर्भ ही काँग्रेसची भूमी आहे, या मातीत भारतीय जनता पक्षाला गाडून विजयाची पताका उभारू, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष 100 हून अधिक जागा जिंकेल, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.
विदर्भात काँग्रेसलाच साथ
भाजप आणि महायुती सरकार हे आयाराम गयाराम सरकार आहे, राज्यातील जनता या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहे. विदर्भातील जनतेने नेहमीच काँग्रेसला साथ दिली, आता विधानसभा निवडणुकीतही ते अशीच साथ देतील, असे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी म्हटलं.