Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना महायुतीत घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोध केला. अजित पवार यांना पत्र (Ajit Pawar) लिहून तसं स्पष्टपणे सांगूनही टाकलं. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ उडाला. याच मुद्द्यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस अजित पवार यांना फोन करून किंवा त्यांना प्रत्यक्षही सांगू शकत होते. पण, त्यांनी असं केलं नाही तर पत्र लिहिलं यामागचं कारण त्यांना धार्मिक ध्रुवीकरण करायचं होतं. ती संधी त्यांना मिळाली आणि तसंच केलं, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
Ajit Pawar : आयुष्यात संघर्ष पाहिला नाही अन् निघाले संघर्ष यात्रेला; अजितदादांचा रोहित पवारांना टोला
चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. चव्हाण म्हणाले, नवाब मलिक यांना महायुतीत घ्यायचं की नाही हे फडणवीसच ठरवू शकतात कारण युतीत सर्वात मोठ्या पक्षाचे ते नेते आहेत. आज फडणवीसांच्याच मर्जीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. फडणवीस अजित पवार यांना एक फोन करून सांगू शकत नव्हते का, की आम्हाला अडचण आहे. आम्ही मलिकांना सोबत घेऊ शकत नाही. पण, तुम्ही पत्र लिहिल. सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं कारण, नवाब मलिक यांच्या धर्मामुळं तुम्ही हे केलंत का, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला.
तुम्ही अनेक भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना बरोबर घेतलं. ज्यांच्यावर पंतप्रधानांनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला त्यांनाही तुम्ही मंत्रिमंडळात घेतलं. आता जर भ्रष्टाचाराचं कारण पुढं केलं जात असेल तर यात काही तथ्य नाही. बकवास गोष्टी आहेत. पत्र लिहिण्याचं कारण काय तर त्यांना धार्मिक ध्रुवीकरण करायचं आहे. संधी मिळाली त्यांनी ते केलं असे चव्हाण यांनी सांगितले.
नवाब मलिक यांच्या नथीतून फडणवीसांचे अजितदादांवर पाच बाण!
नवाब मलिक आमदार आहेत. त्यांच्यावर काही आरोप करण्यात आले आहेत. आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. न्यायालयाच्या प्रक्रियेतून जाऊन त्यांना शिक्षाही झालेली नाही. त्यांना स्वतःच्या बचावाची संधी मिळाली पाहिजे जी त्यांना मिळालेली नाही. आता तु्म्ही कुणालाही काहीही आरोप लावून दोन दोन वर्ष आत टाकू शकता, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.