Vijay Wadettivar : राज्य सरकारला गुजराती लोकांची हुजरेगिरीच करायची, या शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettivar) यांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबईत एका मराठी दाम्पत्याला घर नाकारल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी महिलेने फेसबुकद्वारे लाईव्ह करीत आपल्या व्यथा मांडल्या. राज्यात मराठी माणसाला घरे नाकारत असल्याचा दावा या महिलेने केला होता. या प्रकारावरुन विजय वडेट्टीवार(Vijay Wadettivar) यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
Pankaja Munde : जर निवडणुकीत तिकीट दिलं नाही तर.. पंकजा मुंडेंचा भाजपला रोखठोक इशारा
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील मुलुंड परिसरातील शिवसदन इमारतीमध्ये एक मराठी दाम्पत्य घर पाहण्यासाठी गेलं होतं. सोसायटी सचिवांशी संवाद साधल्यानंतर सचिवांनी या इमारतीमध्ये मराठी माणसं अलाऊड नसल्याचं सांगण्यात आल्याचा दावा महिलेने केला होता. त्यानंतर महिलेले समाजमाध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करुन सर्वच राजकीय पक्षांवर ताशेरे ओढले होते.
Ganeshotsav 2023 : ‘वर्षा’वर विदेशी पाहुण्यांचा ‘गणपती बाप्पा मोरया’, पाहा फोटो
या प्रकाराची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं. घटनेनंतर तत्काळ मनसैनिकांनी सोसायटी सचिवास धारेवर धरल्याचं दिसून आलं. सोसायटीच्या सचिवाला धारेवर धरताच सचिवाने आपला माफीनामाही मागितल्याचं समोर आलं होतं.
लोकसभेपूर्वी काँग्रेसचा मोठा डाव; राहुल गांधी अयोध्येला जाणार? 5 व्यक्तींच्या भेटीने चर्चांना उधाण
यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी इतर मुद्द्यांवरही भाष्य करीत सरकारला धारेवर धरलं आहे. ते म्हणाले, गणपती बाप्पाने जाताना सरकारला सद्बुद्धी द्यावी ही प्रार्थना आहे. मला सकाळी एका बुलढाण्यातील शेतकऱ्याचा कॉल आला त्याने मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं. सरकारकडून मदत मिळत नसल्याचं त्याने सांगतिल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहेत.
तसेच राज्य शासनाचे आदिवासी विद्यार्थ्यांकडेही लक्ष नसून, मंत्री फक्त टेंडरकडे लक्ष देऊन आहेत. त्यामुळे सरकारला थोडीदेखील लाज वाटली पाहिजे. आदिवासी विद्यार्थांना विदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्ती अजून मिळालेली नाही. मराठी माणसाच्या संदर्भात दादागिरी सुरू आहे. सरकारने मुंबईमधून मराठी माणसाला हकालण्याचा विडा उचलला आहे. सरकारला गुजराती लोकांची हुजरेगिरी करायची असून ही दादागिरी निषेधार्ह आहे. सरकारमधील माणसांमध्ये मराठी अस्मिता असेल दोषीला अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.