लोकसभेपूर्वी काँग्रेसचा मोठा डाव; राहुल गांधी अयोध्येला जाणार? 5 व्यक्तींच्या भेटीने चर्चांना उधाण

लोकसभेपूर्वी काँग्रेसचा मोठा डाव; राहुल गांधी अयोध्येला जाणार? 5 व्यक्तींच्या भेटीने चर्चांना उधाण

Ayodhya Ram Mandir : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रभु श्रीरामांच्या जन्मभूमी अयोध्येमध्ये श्रीराम मंदीराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. येत्या डिसेंबरपर्यंत हे मंदिर पूर्ण होण्याची शक्यता असून जानेवारी 2024 मध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ते 24 जानेवारी दरम्यान कोणत्याही दिवशी संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे सांगण्यात येत आहे. (Congress leader Rahul Gandhi will visit Ayodhya before the 2024 Lok Sabha elections and have darshan of Lord Shri Ram)

या सगळ्यादरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधीही 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येत येऊन रामलल्लाचे दर्शन घेऊ शकतात अशा चर्चांना उधाण आलं आहे. राजीव गांधी फाऊंडेशनच्या सीईओ विजय महाजन यांनी नुकतीच अयोध्येला भेट दिली, ही भेटच या चर्चेमागचे मुख्य कारण ठरली आहे. महाजन काही दिवसांपूर्वी अयोध्येला गेले होते. त्यांनी श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.

Maneka Gandhi : ‘इस्कॉन’कडून गाईंची कसायांना विक्री! भाजप नेत्या मनेका गांधींच्या आरोपाने खळबळ

महाजन यांची ही भेट राहुल गांधी यांच्या अयोध्या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत बोलताना सत्येंद्र दास म्हणाले, ‘चार-पाच लोक आले होते. त्यांची नावे काय होती हे सांगता येणार नाही, पण राहुलजी दर्शनासाठी आले तर काय होईल असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर ते आले तर खूप चांगले आहे असे सांगितले. मात्र, येण्याच्या वेळेबाबत त्यांनी काहीही सांगितले नाही. ते म्हणाले की, तिथल्या (दिल्ली) चर्चेनंतर आम्ही तुम्हाला पुन्हा भेटू आणि याबद्दल बोलू. मी त्यांना ठीक आहे, तुम्ही भेटून खात्री करून घ्या, असल्याचे सांगितले आहे,

प्रियांका-राहुल यापूर्वीही अयोध्येला गेले आहेत :

सध्या राहुल गांधी यांच्या जवळच्या सूत्रांकडून किंवा पक्षाकडून याला दुजोरा मिळालेला नाही, मात्र राजीव गांधी फाऊंडेशनच्या सीईओच्या भेटीमुळे चर्चेला नक्कीच उधाण आलं आहे. याआधी 2017 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी अयोध्येत आले होते. येथे त्यांनी हनुमानगढी येथे दर्शन घेतले होते पण ते प्रभु श्रीरामांच्या दर्शनाला गेले नव्हते. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत प्रियांका गांधीही अयोध्येत गेल्या होत्या, पण त्याही केवळ हनुमानगढीला गेल्या होत्या.

Loksabha 2024 : INDIA आघाडीचे लक्ष सेमीफायनलवर; नव्या वर्षात होणार फायनलची तयारी

त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी रामजन्मभूमीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे तिथे गेले नसल्याचे सांगितले. पण आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे आणि राम मंदिर बांधले जात आहे, तेव्हा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तिथे जाण्यास हरकत नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे राहुल गांधी आता अयोध्येला जातात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube