Vijay Wadettiwar : ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil Arrested) याला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. त्यानंतर त्याला पुण्यात आणण्यात आले. या प्रकरणात आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधकांनी पुन्हा सरकारवर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणावर भाष्य करत ललित पाटीलला महायुती सरकारमधील कोणत्या मंत्र्याचा आशीर्वाद होता? असा थेट सवाल विचारला आहे. याबाबत वडेट्टीवार यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
ससून रुग्णालय ड्रग्स प्रकरणातील आरोपी पाटील पंधरा दिवसांनी सापडला, पण असे अनेक "ललित" अजूनही मोकाट आहे.
ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ चे रहस्य काय आहे हे राज्यातील जनतेच्या सामोरं यायला हवे. ललित पाटीलला तुरुंगात टाकून सर्व प्रकरण मिटले हा आव सरकारने आणू नये.
आरोपीला…— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 18, 2023
‘ससून रुग्णालय ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पाटील पंधरा दिवसांनी सापडला. पण, अस अनेक ‘ललित’ अजूनही मोकाट आहेत. ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 16 चे रहस्य काय आहे हे राज्यातील जनतेच्या समोर यायला हवे. ललित पाटीलला तुरुंगात टाकून सर्व प्रकरण मिटले हा आव सरकारने आणू नये. आरोपीला पळायला कुणी मदत केली होती? महायुती सरकारमधील कोणत्या मंत्र्याचा आशीर्वाद पाटीलला होता? रुग्णालयातून ड्रग पुरवण्याचे धंदे कसे सुरू होते? ड्रग्स प्रकरणातील धागेदोरे राज्यात कुठपर्यंत पोहोचले आहे.. असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे’, असे वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
‘देशात मोदी-शहांचा पर्सनल लॉ, अध्यक्षांच्या हाती मात्र तुणतुणे; ठाकरे गटाचा हल्लाबोल
राज्याच्या राजकारणात गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांना ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक करण्यात यश मिळाले आहे. ललित पाटील हा काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. यासाठी दहा पथके तयार करण्यात आली होती. अखेर ललित पाटील पोलिसांच्या जाळ्याात सापडला. चेन्नई येथून त्याला अटक करण्यात आली. ललित पाटील याला लवकरच पुण्यात आणले जाणार असून त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल. 2 ऑक्टोबर रोजी ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
ललित पाटील हा चेन्नईत लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या. यानंतर आता त्याला पुण्यात आणलं जाणार आहे. येथे न्यायालयात हजर केले जाईल.
मोठी बातमी! ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चेन्नईतून अटक; मुंबई पोलिसांची कामगिरी