Maharashtra Politics : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खोचक टीका करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर लक्ष ठेवा हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित ते मंत्री होतील असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर (Maharashtra Politics) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार पलटवार केला. तसेच राणेंना एक जुनी आठवण करून दिली ज्याची आता चांगलीच चर्चा होत आहे. मला कुणाच्याही ऑफरचीड आणि सत्तेची भूक नाही. आधी नितेश राणे यांनी मंत्री व्हावं. वारंवार जे पक्ष बदलतात त्यांच्या मुखातून हेच येणे स्वाभाविक आहे. मी काँग्रेसचा प्रामाणिक शिपाई आहे. पक्षाशी माझी बांधिलकी आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
यानंतर त्यांनी एक जुनी आठवण सांगितली. ते म्हणाले, मी नारायण राणे यांच्यासोबतच काँग्रेसमध्ये आलो होतो. त्यानंतर मात्र राणेंची भूमिका आणखी वेगळी बनली तरी देखील मी मात्र काँग्रेसमध्येच राहिलो. आज मी आहे त्याच ठिकाणी उभा राहून लोकांचे प्रश्न घेऊन सरकार विरोधात लढण्यासाठी सक्षम आहे. मला कुणाच्याही ऑफरची हाव नाही. मला सत्तेचीही भूक नाही.
Nitesh Rane : वडेट्टीवारांवर लक्ष ठेवा कदाचित ते मंत्री होतील; राणेंचा पटोले-राऊतांना खोचक टोला
नितेश राणे जसं स्वत:कडे पाहत आहेत, तसंच त्यांनी दुसऱ्यांकडे पाहु नये, मी काँग्रेसचा (Congress) एकनिष्ठ शिपाई असून माझ्या हायकमांडने माझा प्रामाणिकपणा पाहुनच माझ्यावर विश्वास टाकला आहे, त्यामुळे नितेश राणे यांनी उठवू नये,अशा चॉकलेटला मी प्रतिसाद देणारा कार्यकर्ता नाही, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी नितेश राणेंना सुनावलं.
राणे यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत ठाकरे गटासह काँग्रेसवरही जोरदार टीका केली. राणे म्हणाले, भाजपातील स्फोटावर बोलण्यापेक्षा येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत तुमच्या विजय वडेट्टीवार यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवा. विरोधी पक्षनेते हे हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील अशी चर्चा आमच्या महायुती सरकारमध्ये सुरू आहे असा खोचक टोला त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला होता.
CM शिंदेंची धाकधूक वाढली; राहुल नार्वेकर देणार मोठा निर्णय; 20 ऑक्टोबरकडे लक्ष
काँग्रेस हा गंजलेल्या लोखंडासारखा आहे असे तुम्ही म्हणत असाल, पण भाजप हा विचार नसलेल्या पोकळ बांबूसारखा झाल्याची टीका सामनातून करण्यात आली होती. यावर पलटवार करताना राणे म्हणाले की, भाजपा गंजलेला बांबू तर तुमची उद्धव बाळसाहेब ठाकरे म्हणजे पवारांनी थुंकलेली सुपारी असल्याचे राणेंनी म्हटले आहे.