Congress State President Claim BJP Will New constitution In 2034 : भाजपने काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशीच आंबेडकरांचा मुद्दा उपस्थित केला. यावर कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर (BJP) टीका केलीय. मागील 11 वर्षांमध्ये पंतप्रधान राहून देखील मोदींनी सांगण्यासारखं काहीच केलं नाही, त्यामुळे त्यांनी काल आंबेडकरांचा मुद्दा उपस्थित केला आहे. भ्रम पसरवणे अन् कॉंग्रेसला बदनाम करणं, एवढंच मोदींनी केलंय, अशी टीका सपकाळ यांनी केलंय. पंतप्रधानांना हे वर्तन अशोभनीय आहे.
पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना थेट सन्मानाचे कायदामंत्रीपद दिलं होतं. हे मोदींनी विसरु नये, असं देखील सपकाळ (Harshvardhan Sapkal) म्हणाले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरु आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं ऐक्य त्रिकालबाधित सत्य आहे. दुहेरी स्वरूपात कॉंग्रसने नेहमीच त्यांचा सन्मान केलाय. तर संघाने बाबासाहेबांचा व्यक्ती म्हणून अनादर केलाय. रामलीला मैदानात संविधान जाळण्याचा विचार भाजपचा होता, असा देखील टोला सपकाळ यांनी लगावला आहे.
बीड पुन्हा हादरलं! अनैतिक संबंधातून भाजपा लोकसभा विस्तारकाचा खून; हत्या करतानाचा व्हिडिओ व्हायरल
भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्वान असल्याचं देखील मान्य नाही. हा त्यांचा भ्रम आहे. कॉंग्रेसने माझा पराभव केला, असं बाबासाहेबांनी कुठेही म्हटलेलं नाही. त्यांच्या पश्चात वेगवेगळ्या स्तरावर प्रपोगंडा केला. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत आणि कॉंग्रेसच्या स्वप्नातील भारत दोन्ही एक आहेत. उलट बाबासाहेबांनी पराभवाचं कारण डांगे आणि विनायक दामोदर सावरकर यांच्यावर फोडलं होतं, असं देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय.
मोदींना भारताचं संविधान अमान्य आहे. संविधान निर्मितीपासून समितीत 300 सदस्य होते. मनस्मृतीनुसार संविधान लिहिलं जावं, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक सेवाने केली होती. नवीन संविधान निर्मितीची प्रक्रिया भाजपच्या अन् संघाच्या बगलबच्च्यांनी सुरू केली आहे. इतकंच नाही तर 2034 पर्यंत आम्ही नवी संविधान लागू करू, म्हणून नियमीत त्यांच्या बैठका होत आहे.
अबकी बार चारशे पार असा नारा लगावत असताना प्रचारावेळी त्यांचेच नेते सांगत होते की, आपल्याला संविधान बदलायचं आहे. त्यांचा अजेंडा जगजाहीर आहे. खुलेआम ते सांगत नाही. सातत्याने पडद्याआडून वार करायचा, त्यांची सवय आहे. त्यांना समतेवर आधारित असणारं संविधान बदलायचं आहे. मुंह में राम, बगल में छुरी असं भाजपने करू नये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्यक्तिशः पक्ष संदर्भामध्ये आणि विचारधारेशी संबंधित भारताचं संविधान मान्य नाही, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत.