नवऱ्याचा अघोरी प्रताप! बायकोच्या गुप्तांगात हळदी-कुंकू भरत लिंबू पिळलं, पुण्यात धक्कादायक घडलं

Husband Squeezed Lemon Halad Kumkum In Wifes Private Part : पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली. पती पत्नीत वाद (Pune Crime)झाला. पत्नीने न्यायालयात धाव घेत पोटगीची मागणी केली. मग काय? पती संतापला अन् रागाच्या भरात त्याने विकृतीचा कळस गाठला. पत्नी मुलांची कागदपत्रे घेण्यासाठी नवऱ्याच्या घरी आली. तेव्हा त्याने तिच्या इच्छेविरूद्ध शारिरीक संबंध (Physical Relation) ठेवले.
पत्नीच्या गुप्तांगामध्ये त्याने हळदी-कुंकू भरत त्याने लिंबू पिळल्याचं समोर आलाय. असा आरोप पत्नीने केलाय. ही घटना वर्षभर अगोदरची सांगितलं जातंय. याप्रकरणी पीडित पत्नीने सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तर पिंपळे निलखच्या विशालनगरमध्ये ही धक्कादायक घटना (Husband Squeezed Lemon In Wifes Private Part) घडलेली आहे.
तेलंगाणात आरक्षणाचे उप वर्गीकरण आणि क्रिमी लेअर लागू करण्याचा निर्णय, वंचितने कॉंग्रेसला घेरलं
या दाम्पत्याचं 2004 मध्ये लग्न झालं होतं. त्यांना तीन मुलं देखील आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद सुरू झाले. अनेकदा हे वाद मिटले देखील होते. परंतु 2023 मध्ये झालेला वाद टोकाला गेला. दोघेही वेगळे झाले. पीडित महिला (Pune News) आपल्या दोन्ही मुलांसह स्वतंत्र राहू लागली. तर आरोपी पती पिंपळे निलख परिसरामध्ये दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेला होता. त्यानंतर पत्नीने घटस्फोट अन् पोटगीसाठी कोर्ट गाठलं. यामुळे पतीच्या संतापात अजूनच वाढ झाली.
या सगळ्यातच पीडित महिला मुलांची कागदपत्रे अन् शाळोपयोगी साहित्य घेण्यासाठी 2024 मध्ये पतीच्या घरी गेली. त्यावेळी तिचा पती दारूच्या नशेत होता. त्याने पीडितेसोबत पोटगीवरून वाद घालायला सुरूवात (Crime News) केली. तिला अश्लील शिवीगाळ देखील देणं सुरू केलं. त्याने तिच्या गळ्यावर चाकू ठेवून जबरदस्तीने शारिरीक संबंध निर्माण केले. गळ्यावर कोयता ठेवून धमकावलं अन् तिला कपडे काढायला लावले.
पीडितेच्या गुप्तांगामध्ये हळदी-कुंकू भरले. त्यामध्ये लिंबू देखील पिळले. मी तुझ्यावर जादूटोणा केलाय. आता तू वेडी होणार. परंतु तुझ्यासोबत मी जे काही केलंय, त्याबद्दल कोणाला सांगितलं तर जीवे मारून टाकेन, अशी धमकी देखील त्याने पीडितेला गेलाय.
या सगळ्या प्रकारानंतर पीडित महिला अन् तिचं कुटूंब प्रचंड घाबरलं होतं. घडलेला प्रकार आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते दीपक कांबळे यांना सांगण्यात आला. त्यानंतर कांबळे यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. ते पीडित महिलेला सांगवी पोलीस ठाण्यात घेवून गेले अन् तक्रार नोंदवली. वरील सर्व आरोप पीडित महिलेने फिर्यादीमध्ये केला आहे. सांगवी पोलीस स्टेशनमध्ये या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलाय. जून 2024 मध्ये नेमकं काय घडलं होतं? पोलीस आता याचा तपास करीत आहेत.