Harshwardhan Sapkal On Suresh Dhas Dhananjay Munde meeting : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे पडसाद अजून शांत झाले नाहीत, तोच याप्रकरणात मोठी भूमिका घेणारे आमदार सुरेश धस यांनी यु-टर्न घेतल्याच्या चर्चांणा उधाण आलंय. भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) मागील दोन दिवसांत पुरते अडचणीत सापडले आहे. त्यांची बीडमध्ये धनंजय मुंडेंविरोधातील भूमिकाच संशयाच्या फेऱ्यात आहे. त्यांनी गुप्तपणे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली, त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठं वादळ उठलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्षांनी (Harshwardhan Sapkal) आमदार सुरेश धसांवर सडकून टीका करतच एक खळबळजनक दावा केलाय. त्यामुळे महायुतीतच खटके उडण्याची शक्यता आहे.
अमेरिकेची भूमिका… जैसे थे! साखळदंड अन् हातात बेड्या, 116 भारतीयांसह दुसरं विमान अमृतसरमध्ये पोहोचलं
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. टीआरपी वाढवण्याकरीता केलेलं हे सगळं प्रकरण होतं. राष्ट्रवादी कॉंग्रेसचं महत्व कमी करण्यासाठी भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आमदार सुरेश धस यांना दिलेली सूचना होती, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. त्याच्या पलीकडे जावून पहिल्यांदा आका, आका, आका,…बंदूक, बंदूक, बंदूक…रेती, रेती, रेती…टीप्पर, टीप्पर, टीप्पर…सगळे शब्द रांगड्या भाषेत मांडल्या जातात. हे सगळे शब्द आता मागे पडले आहेत. त्यानंतर आता मांडवली…मांडवली…मांडवली याची गुंज आता या प्रकरणातून आपल्याला ऐकू येते, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक प्रकरणं एकामागून एक समोर आलेत. खंडणी, घोटाळे, खूनाची मालिकाच परळीत असल्याचं उघड झालंय. मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात त्यांच्या पक्षातील आमदार सुरेश धस यांनी मोठी टीका केली. आमदार सुरेश धस यांनी तर आका आणि आकाचे आका असा सूरच लावला होता. पण त्यानंतर सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची झालेल्या भेटीमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.
अहिल्यानगरमध्ये कोतकरांना मोठा दणका! नेप्ती बाजार समितीवरून नाव हटवलं
त्यावर आता काँग्रेसमधून तिखट प्रतिक्रिया समोर आली आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात सुरेश धस आरोप का करत होते? याचा मोठा गौप्यस्फोट हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. “टीआरपी वाढवण्याकरता केलेला भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आमदार धस यांना दिली सूचना होती” असा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी केलाय. महायुतीमध्ये भाजप इतर पक्षांना बदनाम करत असल्याचा टोलाच अप्रत्यक्षपणे हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावलाय.
मुंडे भेटीनंतर सुरेश धस यांच्यावर मोठी टीकेची झोड उठली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही भेट चार ते साडेचार तास चालल्याचं सांगितलं आहे. त्यावरून आता धस सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. माझी बदनामी करणाऱ्याचं नावं मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार, असा इशारा देखील सुरेश धस यांनी दिलाय.