‘हिशोब तर द्यावाच लागणार’; कथित खिचडी घोटाळ्यावरुन सोमय्या-राऊतांमध्ये धुमश्चक्री

Sanjay Raut-Kirit Somaiya : विरोधकांचे भ्रष्टाचार बाहेर काढण्यात अग्रस्थानी असलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांना अटक तर संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची चौकशी ईडीकडून सुरु आहे. त्यावरुन संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांचे नाव घेत […]

'सोनिया अन् राहुल गांधींचा जयजयकार कराणाऱ्यांना आता राम आठवला का?' सोमय्यांचा खोचक सवाल

'सोनिया अन् राहुल गांधींचा जयजयकार कराणाऱ्यांना आता राम आठवला का?' सोमय्यांचा खोचक सवाल

Sanjay Raut-Kirit Somaiya : विरोधकांचे भ्रष्टाचार बाहेर काढण्यात अग्रस्थानी असलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांना अटक तर संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची चौकशी ईडीकडून सुरु आहे. त्यावरुन संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांचे नाव घेत टीका केली. त्यावर बोलताना भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात धुमश्चक्री सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

अजित पवार लांडग्यांच्या भूमिकेत, बारामतीत ते सायकलवर फिरायचे…; संजय राऊतांचे टीकास्त्र

कोविड काळात खिचडी प्रकरणात ईडीकडून ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण यांना अटक आली. त्यानंतर आता या प्रकरणात संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांच्यासह माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीवर संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांची थेट नाव घेत सडकून टीका केली.

संजय राऊत काय म्हणाले?
कोविड काळातील खिचडी घोटाळ्यातील सर्वजण आज भाजप आणि मिंधे गटात गेले आहेत. ‘वर्षा’ आणि ‘देवगिरी’ बंगल्यावर त्यांची केटरींग सुरु असून शिंदे गटाचा मुलुंडचा एक जण या घोटाळ्यात पार्टनर आहे. त्याला हात लावत नाही पण सुरज चव्हाणला अटक केली आहे. या घोटाळ्यात तुम्ही अमेय होले, वैभव थोरात देखील या घोटाळ्यातील नावे आहेत. कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार यांनी केलायं. राहुल कनाल याच्यासह अजूनही नावे सांगणार असल्याचा इशाराच राऊतांनी दिला आहे.

राणे केवळ भाजपची लाचारी करतात, पण आता भुंकणाऱ्यांचे दिवस…; विनायक राऊतांची जहरी टीका

तसेच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पाच महिलांचं शोषण केलं आहे त्यांना आम्ही न्यायालयात नेणार आहे. पण असं राजकारण आम्ही करीत नाही. त्यालाही कुटुंब आहे पाच महिला तक्रार द्यायला तयार आहे आणि हा आमच्यावर आरोप करतोयं. त्याची लायकी काय. उलटा टांगून मारु त्याला आमचाही बॉस बसलायं सागर बंगल्यात नाही पण कुठंतरी बसलायं…असंही ते म्हणाले आहेत.

किरीट सोमय्यांचं प्रत्युत्तर…
महाविकास आघाडी सरकारच्या काळात किती लुटमार केलीयं हे सर्वांना माहिती आहे. अमोल किर्तीकर सूरज चव्हाण करोडो रुपये यांच्या खात्यात गेली ते म्हणतात खिचडी बनवण्याचे पैसे आहेत हे. संजय राऊतांनी माझ्यावर अनेक आरोप केले आहेत पण त्या आरोपांच्या पुराव्याचा एकही कागद त्यांने समोर ठेवलेला नाही. पहिला भावाचा, मुलीचा, पार्टनरचा हिशोब द्या, असं सोमय्यांनी स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version