Download App

‘इतका स्नेह संबंध, मग पत्र का लिहावं लागलं?’, फोटो ट्वीट करत मनसेचा फडणवीसांना टोला

  • Written By: Last Updated:

MNS on Devendra Fadanvis Letter : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलि (Nawab Malik) राष्ट्रवादीत असताना सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने त्यांच्यावर दाऊतच हस्तक असा आऱोप केला होता. दरम्यान, आता मलिक जामीनावर बाहेर असून काल त्यांनी हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. ते सत्ताधारी बाकावर बसले. यावरूण एकच रणकंदन माजले. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच मांडीला मांडी लावून बसायचं, असा आरोप भाजपवर झाला. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहून मलिकांना महायुतीत घेणं योग्य होणार नाही, असं सांगितलं. या सगळ्या घडामोडीनंतर आता मनसेनं यावर भाष्य केलं.

‘अजित पवार गटाचा चाचणीपासून पळ काढण्याचा प्रयत्न’; शरद पवार गटाचा आरोप 

मनसेच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक फोटो शेअर केला. शेअर केलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल दिसत आहेत. मनसेनं लिहिलं की, इतका स्नेह संबंध आहे, तर पत्र का लिहावं लागलं? सुहास्य वदन दाखवण्याची ही कोणती धडपड? नबावचा जबाव द्या किंवा नका देऊ, पण तुम्ही घातलेल्या राजकीय ढोंगीपणाच्या नकाबचा जवाब मात्र, तुम्हाला जनतेला द्यावाच लागले. नाहीतर जनता अगदी योग्यवेळी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवेल, असा इशारा मनसेनं दिला.

Sanjay Raut Vs Nitesh Rane : आता मोईत्रानंतर संजय राऊतांचा नंबर, नितेश राणेंकडून ट्वीट 

फडणवीस यांचे अजित पवारांना पत्र

नवाब मलिक यांनी काल विधानसभा परिसरात येऊन कामकाजात सहभाग घेतला. विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांना हा अधिकार आहे. त्यांच्याशी आमचे कोणतेही वैयक्तिक वैर किंवा पूर्वग्रह नाहीत. मात्र त्यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप झाले आहेत ते पाहता त्यांना महायुतीत सहभागी करणं योग्य होणार नाही, असं आमचं मत आहे. सत्ता येते, जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे, असं फडणवीसांनी म्हटलं होतं.

पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया-
आपल्याला देवेंद्र फडणवीस यांचे मिळाले. आपण हे पत्रही वाचलं. नवाब मलिक पहिल्यांदाच सभागृहात आले. त्यांची भूमिका ऐकून मी माझे मत मांडेन. मलिक यांच्या भूमिकेनंतर मी माझी आणि पक्षाची भूमिका जाहीर करेन. आधी मलिक यांचे मत काय ते स्पष्ट करू. सभागृहात कोणी कुठे बसायचे हे ठरवण्याचा अधिकार माझा नाही. हा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असल्याचे अजित पवार म्हणाले.

Tags

follow us