Sanjay Raut Vs Nitesh Rane : आता मोईत्रानंतर संजय राऊतांचा नंबर, नितेश राणेंकडून ट्वीट
Nitesh Rane : पैसे घेऊन प्रश्न विचारल्याबद्दल तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलंय लोकसभेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी संसदेच्या आचार समितीने मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, महुआ मोइत्रा यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) ‘सब गटर बंद करो’ असं ट्विट केलं. त्यात त्यांनी संजय राऊतांचंही नाव घेतलं. त्यामुळं पुढचा नंबर राऊतांचा, असा संकेत राणेंनी दिला.
दर्शन हिरानंदानी अन् महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द…नेमकं प्रकरण काय?
मोईत्रा यांनी पैस घेऊन प्रश्न विचारल्याचे आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. त्यानंतर मोइत्रा यांनी हे आरोप फेटाळले. परंतु उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना आपण संसदेचं लागइन व पासवर्ड दिल्याचं त्यांनी सांगितलं.
निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रावर पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. मोईत्रा यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले होते. मात्र उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना आपण संसदेचे लॉगिन आणि पासवर्ड दिल्याची कबुली मोईत्रा यांनी दिली. त्यानंतर आज मोईत्रा यांचे सदस्यत्व रद्द झालं. यावरून आमदार नितेश राणेंनी आता पुढचा नंबर कुणाचा असेल,याबाबत संकेत दिले. त्यांनी थेट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचे नाव घेतले.
नवाब मलिक यांच्या नथीतून फडणवीसांचे अजितदादांवर पाच बाण!
नितेश राणे यांनी मोईत्रा यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर एक ट्वीट केलं. त्यात त्यांनी लिहिलं. ‘आता मोईत्रा नंतर संजय राऊत? सब गटर बंद करो दो… स्वच्छ भारत अभियान, असं ट्वीट राणेंनी केलं. त्यांनी महुआ मोईत्रा आणि संजय राऊत यांचा उल्लेख गटर असा केला.
नेमके आरोप काय होते?
संसदेच्या शिस्तपालन समितीने तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्याविरोधातील कॅश फॉर क्वेरी प्रकरणात लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली होती. या अहवालाची तात्काळ कारवाई करत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आवाजी मतदान घेतले आणि मोइत्रा यांची खासदारकी रद्द केली. महुआ मोईत्रा यांच्यावर लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून 2 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप होता. भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या तक्रारीनंतर संसदेच्या शिस्तपालन समितीने या प्रकरणाची चौकशी केली होती.
दरम्यान, आता भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत महुआ मोइत्रा यांच्यानंतर संजय राऊतांचा नंबर आहे, असं लिहिलं. मोईत्रा यांचे सदस्यत्व रद्द झाले, तसे संजय राऊत यांचेही सदस्यत्व रद्द व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. एवढचं नाही तर पुढचा नंबर राऊतांचा असेल, असेही संकेत त्यांनी यातून दिले. त्यांनी राऊतांचा उल्लेख गटर असाही केला. त्यावर आता संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.