Download App

दादा, तुम्ही फक्त भावी मुख्यमंत्र्याच्या बॅनरच्या स्पर्धेत अडकला!; नितेश राणेंचा खोचक टोला

  • Written By: Last Updated:

मुंबई: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला उधाण आलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. शिंदे गटाकडून संजय राऊतांना लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाषणाचा असून अजित पवारांनी या व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंची (Narayan Rane) चांगलीच खिल्ली उडवली.

कसब्यातील प्रचारसभेतला हा अजित पवार यांचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत अजित पवारांनी सांगितलं की, शिवसेना पक्ष फोडणाऱ्या सर्वांचा पुढील निवडणुकीत जनतेने पराभव केला. नारायण राणे तर दोनवेळा पडले. एकदा कोकणातून त्यांचा पराभव झाला. तर दुसऱ्या वेळी वांद्रे मतदारसंघात एका बाईने नारायण राणेंना पाडलं, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या टीकेचा नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन समाचार घेतला आहे.

नितेश राणे यांनी अजितदादांना प्रत्युत्तर देताना त्यांच्या दुखऱ्या जखमेवर बोट ठेवले आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून लढणाऱ्या अजित पवारांचे पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांना धोबीपछाड केलं होतं. हाच धागा पकडत नितेश राणे यांनी अजित पवारांना खोचक प्रत्युत्तर दिले. गेल्या वेळी बिचारा. एका साध्या शिवसैनिकाने पाडला माझ्या मित्राला. म्हणून ते काही होत का बघा. राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री. मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले. आपण काय फक्त भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात, असं ट्विट करून नितेश राणे यांनी अजित पवारांना टोला लगावला.

Women’s T20 WC: ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा अंतिम फेरीत, आतापर्यंत ‘एवढ्या’ वेळा विजेतेपद पटकावले

तसेच अजित दादा मोठे नेते. पण वाचल्या शिवाय जमतच नाही बघा. राष्ट्रवादीच्या scriptwriter मित्रांनी जरा योग्य माहिती “लिहून” दिली पाहिजे. राणे साहेबांबरोबर शिवसेनेतून आलेले सगळे आमदार परत निवडून आले. शाम सावंत सोडून. माहिती असुदे दादा, असेही ट्विट नितेश राणे यांनी केले.

Tags

follow us