Women’s T20 WC: ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा अंतिम फेरीत, आतापर्यंत ‘एवढ्या’ वेळा विजेतेपद पटकावले

  • Written By: Published:
Women’s  T20 WC: ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा अंतिम फेरीत, आतापर्यंत ‘एवढ्या’ वेळा विजेतेपद पटकावले

Women’s T20 World Cup: महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये, ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये पोहोचला आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 5 धावांनी पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट बुक केले. त्याचवेळी, आज (24 फेब्रुवारी, शुक्रवार) इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. महिला T20 विश्वचषकाची सुरुवात 2009 मध्ये झाली, इंग्लंड पहिला विजेता ठरला होता, तेव्हापासून एकूण 7 विश्वचषक खेळले गेले आहेत आणि यंदा म्हणजे 2023 ला आठवा विश्वचषक खेळला जात आहे.

ऑस्ट्रेलियाचा दबदबा कायम आहे

यंदा ऑस्ट्रेलिया संघ सातव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया 2010, 2012, 2014, 2018 आणि 2020 मध्ये विजेता ठरला. याशिवाय 2016 मध्ये ऑस्ट्रेलिया उपविजेता ठरला होता. आणि यावेळी पुन्हा ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये धडक मारली आहे.

ऑस्ट्रेलिया विजयाची हॅट्ट्रिक करू शकते?

गेले दोन विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. जा यंदा ऑस्ट्रेलिया पुन्हा विजयाची नोंद करून ऑस्ट्रेलिया महिला टी-२० विश्वचषकात विजयाची हॅट्ट्रिक करू शकते. महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ ऑस्ट्रेलिया ठरला आहे.

हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोचे काही फोटो 

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा आतापर्यंतचा प्रवास

सध्या सुरू असलेल्या महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची कामगिरी उत्तम आहे. या संघाने साखळी सामन्यापासून आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 97 धावांनी, बांगलादेशचा 8 गडी राखून, श्रीलंकेचा 10 गडी राखून, दक्षिण आफ्रिकेचा 6 विकेट राखून तर भारताचा उपांत्य फेरीत 5 धावांनी पराभव केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube