Download App

अजितदादा निवडणूक लढवणार नाही? मंत्री छगन भुजबळांचं सूचक विधान

अजित पवार आमचे कॅप्टन, ते निवडणूक लढवणार आहेत, ते शस्त्र टाकू शकत नाहीत, असं सूचक विधान मंत्री छगन भुजबळांनी केलंय.

Chagan Bhujbal : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहु लागलंय. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभा निवडणुकीबाबत विधान केलं होतं. अजितदादांच्या या निवडणुकीनंतर आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी सूचक विधान केलंय. अजित पवार आमचे कॅप्टन, ते निवडणूक लढवणार आहेत, ते शस्त्र टाकू शकत नाहीत, असं भुजबळांनी स्पष्ट केलंय.

खूशखबर! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ, फडणवीसांची मोठी घोषणा

एका कार्यक्रमादरम्यान बोलताना अजित पवार यांनी निवडणुकीबाबत बारामती मतदारसंघात निवडणूक लढवणार नाही, या अनुषंगाने विधान केलं होतं. त्यानंतर अजित पवार निवडणूक लढणार नसल्याचं दिसून येत होतं. मात्र, छगन भुजबळ यांनी एक सूचक विधान केलंय. ते म्हणाले, अजित पवार हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत. ते निवडणूक लढवणार आहेत. असं मध्येच ते शस्त्र टाकू शकत नाहीत, असं भुजबळ म्हणाले आहेत.

Khatron Ke Khiladi 14: अभिषेक कुमार कृष्णासाठी जॅकी श्रॉफच्या घरी गेल्यावर अभिनेत्याची काय प्रतिक्रिया असेल?

तसेच महायुतीमधील पक्षांना जर चांगलं यश मिळवायचं असेल तर मला वाटतं महायुतीमधील नेत्यांनी एकमेकांवर कोणतेही विधान करू नये. कारण एकमेकांच्या विरोधातील विधानांमुळे विरोधी पक्षाला टीका करायला खाद्य मिळतं. शेवटी सर्वांचं लक्ष्य एकच आहे की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणणं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना सूचना दिल्या आहेत. आता निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे कोणीही काहीही विधाने करू नये, असं भुजबळांनी स्पष्ट केलंय.

Akshay Kumar: खिलाडी कुमारने वाढदिवशी चाहत्यांना दिलं मोठं गिफ्ट; ‘भूत बंगला’चा फर्स्ट लूक आला समोर

काय म्हणाले होते अजित पवार?
मी आत्ता 65 वर्षांचा असून समाधानी आहे, जिथं पिकतं तिथं विकत नसतं, त्यामुळे बारामतीकरांना मी सोडून दुसरा कोणीतरी आमदार मिळायला हव मग 1991 ते 20024 च्या माझ्या अन् नव्या माणसाच्या कारकिर्दीची तुलना करा, असं अजित पवार एका कार्यक्रमात म्हणाले होते.

follow us