Download App

हौशे, गौशे, नौश्यांना..बळी पडू नका; ‘लाडकी बहीण योजने’च्या टीकेवरुन अजितदादा कडाडले

हौशे, गौशे, नौश्यांच्या गोष्टींना बळी पडू नका, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर कडाडले आहेत. ते कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात बोलत होते.

Ajit Pawar : हौशे, गौशे, नौश्यांच्या गोष्टींना बळी पडू नका, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विरोधकांवर कडाडले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी योजनेवरुन (Mukhyamantri Ladki Bahin Yojna) विरोधकांकडून टीका केली जात आहे. या टीकेचा अजित पवार यांच्याकडून खरपूस समाचार घेण्यात आलायं. महायुतीचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मेळावा आज कोल्हापुरात पार पडला. या मेळाव्यादरम्यान अजित पवार बोलत होते.

मोठी बातमी : विद्यार्थ्यांच्या रेट्यापुढे MPSC नमलं; परीक्षा पुढे ढकलली; मात्र विद्यार्थी आंदोलनावर ठाम

अजित पवार म्हणाले, महायुतीचं सरकार काम करणारं सरकार असून वेळकाढूपणा करणारं सरकार नाही, हौशे, गौशे, नौशे बोलतात की पैसे परत काढून घेतील विरोधकांची ही थाप असून जनतेला दिलेले पैसे कोणताच माय का लाल काढून घेऊ शकत नाही, तरीही विरोधक गैरसमज करीत आहेत. सरकारबद्दल अविश्वास निर्माण करण्याचं काम विरोधकांकडून केलं जात आहे. विरोधकांच्या या गोष्टीला बळी पडू नका, असं अजित पवार म्हणाले आहेत.

तसेच पुढील काळात अर्थसंकल्पामध्ये सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येणार आहेत. विरोधक नेते एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना भडकवत आहेत. विरोधक म्हणतात की हे सरकार होऊ देत नाही पण सरकार का होऊ देणार नाही. एमपीएससी ही एक स्वायत्ता संस्था आहे. यामध्ये सरकार लक्ष घालू शकत नाही. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यामध्ये लक्ष घातलं आहे. आता एकाच दिवशी आलेल्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीकडून घेण्यात आला असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

<a href=”https://letsupp.com/entertainment/thalapathy-vijay-enters-politics-launches-his-party-flag-and-anthem-179445.html”>अभिनयाला रामराम अन् राजकारण फुलटाइम; थलपती विजयने पक्षाचा झेंडा केला जाहीर

निवडणुका जवळ येताच विरोधकांच्या पोटात दुखतं:
आगामी विधानसभा निवडणुका पुढील काही महिन्यांत पार पडणार आहेत. निवडणुका जवळ यायला लागल्या की विरोधकांच्या पोटात दुखायला लागलंय. सरकार चालवताना आम्ही महिला, शेतकरी, वारकरी, युवक, समाजातील सर्व घटकांसाठी योजना आणल्या आहेत, कोणालाही वंचित ठेवलं नाही, त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे, विरोधक सतत सरकारच्या विरोधात प्रयत्न करीत असल्याची टीका अजित पवार यांनी केलीयं.

दरम्यान, महायुतीच्या माध्यमातून राज्यभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मेळावा सुरु आहे. काल नाशिक, बीडनंतर आज कोल्हापुरात पार पडला. यावेळी बोलताना ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यांत अर्ज दाखल केले आहेत. अशा महिलांना जुलैपासून महिन्याला पैसे मिळणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय.

follow us