Dcm Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड घडल्याचे पाहायला मिळालं. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार,(Ajit Pawar) खासदार सुप्रिया सुळे एकत्र आल्याचं दिसून आलं. अजितदादा काही दिवसांपासून आजारी असल्याचं कारण देत होते, त्यानंतर अचानक पवार फॅमिली एकत्र आलीयं. त्यानंतर दादांनी लगेचच दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. एकाच दिवशी घडामोडी घडल्याने नेमकं अजितदादांच्या मनात चाललंय तरी काय? हा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
आयकर विभागाच्या धाडीनंतर बीडमधील बड्या उद्योगपतीचा भाजपमध्ये प्रवेश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी शरद पवार यांची भेट घेतली. संध्याकाळी लगेचच दिल्लीमध्ये धाव घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गेले काही दिवस अजितदादा डेंग्यूमुळे आजारी होते. मात्र आज धनत्रयोदशीच्या दिवशी ते सार्वजनिक फोटोमध्ये दिसले. अजितदादांनी आपल्या आजच्या कृतीमधून भाजपच्या मनातील गोंधळ दूर करण्याचा तर प्रयत्न केला नाही ना? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दिवाळीनिमित्त पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन हा सण उत्साहात आणि जोरात साजरा करतात अशी अनेक वर्षांची परंपरा आहे. यानिमित्त पवार कुटुंबियात पुन्हा मनोमिलन तर होणार नाही ना? अशीही शंका अनेकांच्या मनामध्ये येऊन गेली आहे. या शंकेचे निरसन करण्यासाठीच अजित पवारांनी आधीच ‘प्लॅन बी’ आखला होता की काय? असं आजच्या भेटीतून दिसून येत आहे.
‘गज कापून पळाले, शेतात लपले पण, जाळ्यात अडकलेच’; ‘त्या’ चार सराईतांना पुन्हा बेड्या
शरद पवार यांचे बंधू आणि ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांच्याकडे पवार कुटुंबाचा आजच्या दिवसातला दिवाळीतील पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. अजितदादा बारामतीत नेहमीप्रमाणे होणाऱ्या पवार कुटुंबीयांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत मात्र, आजच्या पहिल्या कार्यक्रमाला हजेरी लावत त्यांनी पवार कुटुंबातील इतर सदस्यांची मने राखली आहेत.
अजितदादांनी कुटुंबियांची मने राखलीत खरी पण या दिवाळीच्या भेटीचा वेगळा राजकीय अर्थ निघू नये, म्हणून दादांनी तातडीने दिल्ली देखील गाठली. पक्षाचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना सोबत घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अजितदादांच्या या कृतीमुळे भाजपच्या अनेक नेत्यांच्या मनातील गोंधळी दूर झाला असेल पण राष्ट्रवादीत आणि पवार कुटुंबात फूट पडलेलीच आहे हे देखील आज अजितदादांनी पुन्हा एकदा प्रकर्षाने दाखवून दिले आहे.