Ajit Pawar : अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपाचाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला नाही. दरम्यान, मुख्यमंत्री व्हायची माझी इच्छा आहे, पण संधीच मिळत नाही, माझी उपमुख्यमंत्रीपदावरच गाडी अकडून आहे, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) केलं.
Swargate Metro: आरारा… खतरनाक… अंडरग्राउंड स्वारगेट मेट्रो स्थानकाचे मनमोहक फोटो व्हायरल
इंडिया टुडेने आज अजित पवारांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. नितीशकुमार यांच्याप्रमाणे उपमुख्यमंत्रीपदाचा विक्रमही तुमच्याकडे आहे. मुख्यमंत्री व्हावे असे कधी वाटते का? असा प्रश्न विचारला असता अजितदादा म्हणाले, मलाही वाटतं की, मुख्यमंत्री व्हावं. पण माझी गाडी उपमुख्यमंत्रीपदावरच अडकली आहे. मी पूर्ण प्रयत्न करतोय की गाडी पुढं जावी, पण संधी मिळत नाही. 2004 साली राष्ट्रवादीला मुख्यमंत्री होण्याची संधी होती, पण पक्ष नेतृत्वाने ती संधी गमावली, असं अजित पवार म्हणाले.
तुम्ही बंदूक दाखवा, आम्ही संविधान दाखवू; बॅनरबाजीवरुन सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना सुनावलं
पुढं ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर जो बसतो त्याला ती सीट आवडते. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी एकच सीट आहे. ज्याच्याकडे 145 हा जादुई आकडे असेल तो मुख्यमंत्री होईल, असं ते म्हणाले.
महायुती तुटणार नाही
अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर ते म्हणाले की, मी सध्या महायुतीचा एक घटक असून आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजप आणि शिंदे गटाच्या सहकार्यानेच लढणार आहे. आम्ही तिघेही (भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट) लवकरच जागावाटप करू. कोणाच्या वाट्याला किती जागा येतील, हे लवकरच समोर येईल. एकच सांगतो, आमची महायुती तुटणार नाही. महायुतीचे सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं त्यांना स्पष्ट केलं.
शरद पवारांची साथ सोडल्याबद्दल खंत वाटते का? या प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले की, जे काही झाले त्याचा विचार करणे आम्ही सोडून दिलं. आता आम्ही खूप पुढं गेलो. आम्ही कामाची माणस आहोत. आम्हाला काम करायचे आहे. महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. जुन्या गोष्टींचा विचार करण्यात आता अर्थ नाही, असं ते म्हणाले.
सुप्रिया शुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यास अमित शहांनी सांगितले होते का? त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, मला कोणी सांगितले नव्हते. मी कोणाचेच ऐकत नाही. निकाल आल्यावर मला समजले की ही माझी चूक होती, असं अजित पवार म्हणाले.