Swargate Metro: आरारा… खतरनाक… अंडरग्राउंड स्वारगेट मेट्रो स्थानकाचे मनमोहक फोटो व्हायरल
Swargate Metro Station: PM नरेंद्र मोदी उद्या (26 सप्टेंबर) रोजी शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहेत.

PM नरेंद्र मोदी उद्या (26 सप्टेंबर) रोजी शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहेत.

दरम्यान स्वारगेट अंडरग्राउंड मेट्रो स्टेशनची काही मनमोहक फोटो पुणे मेट्रोने त्यांच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आली आहेत.

पुणे मेट्रोने स्वारगेट स्थानकाचे फोटो शेअर केल्यानंतर नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

यावेळी एका एक्स युजरने स्वारगेट अंडरग्राउंड स्टेशनचा व्हिडिओ शेअर करण्याचीही मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 26 सप्टेंबर रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे उद्घाटन होणार आहे.
