Ajit Pawar : सध्या देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha elections) वारे वाहायला लागले. भाजपकडून 400 पारचा नारा दिला जातोय, तर विरोधकांकडून इंडिया आघाडीची (India Aghadi) देशात सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar)मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असं ते म्हणाले.
साताजन्माच्या गाठी.! ‘प्रथमेश-क्षितीजा’ अडकले लग्नाच्या बेडीत, विवाहसोहळ्यातील पहिला फोटो समोर
माझं नाणं खणखणून वाजते
भोर- वेल्हा- खडकवासला ग्रामीण मेळाव्यात बोलतांना अजित पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते आपल्या भाषणात म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघात मी मोठा निधी देण्याचा प्रयत्न केला. मी कामाचा हापलेला आहे य 32 वर्ष मी जिल्हा बँकेचा अध्यक्ष होतो, आताच राजीनामा दिला. मी कामाचा माणूस आहे, मी कडक बोलत असतो, माझं नाणं खणखणून वाजत असते. पालकमंत्री पदाचा फायदा 13 तालुक्यातील नागरिकांना व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे, असं अजित पवार म्हणाले.
कालवा सल्लागार समितीच्या आज मी सात बैठका घेतल्या. यंदा धरणांची परिस्थिती चांगली नाही आहे. पुढच्या वर्षी डीपीडीसीला साडे बाराशे कोटी रुपये ठेवले जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले.
नवे फौजदारी कायदे 1 जुलैपासून होणार लागू, गृहमंत्रालयाने काढली अधिसूचना; काय आहेत हे कायदे?
विकासाकरता घड्याळाला मतदान करा
पुढं बोलतांना ते म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघात मी मोठा निधी दिला. अनेकांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं. त्यांची कारकीर्द तुम्ही बघितलीच आहे. आता योग्य उमेदवार देण्याचं काम महायुती करणार आहे, तुमचं पवित्र मत त्यांना द्यायचं आहे. उद्याचा महायुतीचा उमेदवार जो कुणी असेल त्याला मतदान करा, त्याची निशाणी घड्याळ असणार आहे, विकासाकरता घड्याळाला मतदान करा, असं आवाहनही अजित पवारांनी केलं.
कुठे भावनिक होऊ नका, नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, त्यासाठी घड्याळाला मतदान करा. 65 टक्के लोकांनी मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचं सर्व्हेत सांगितल. आता आपल्याला पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणायचं आहे. त्यासाठी कामाला लागलं पाहिजे. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असं ते म्हणाले.
महानंद डेअरी कुठेही गेली नाही
दरम्यान, राज्यांतील प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप विरोधककांकडून नेहमीच केला जातो. आता महानंदा दूध प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याची टीका राज्य सरकारवर होत आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, महानंद डेअरी कुठेही गेली नाही, गोरेगावलाच आहे. तिकडे येऊन बघा. महानंद तिथेच दिसेल. विरोधकांना बोलायला काही राहील नाही, त्यामुळं ते अशी चर्चा करत आहेत, अशी टीका अजित पवारांनी केली.