Download App

पालकमंत्रिपदावरच काय अडलंय? रायगडवरुन अजितदादांचा सवाल

रायगडला पालकमंत्रीपद दिलं नाही म्हणून काही अडलं आहे का? सर्व काम होत आहेत, असं म्हणत अजितदादांनी पालकमंत्रीपदाच्या वादावर भाष्य करणं टाळलं.

Ajit Pawar : सत्ता स्थापन होऊन महायुती सरकारला (Mahayuti) शंभरहून अधिक दिवस झाले आहेत. पण अद्याप नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा (Guardian Minister of Raigad) तिढा सुटलेला नाही. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रीपदावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) भाष्य केलं.

तरुणांना संधी, राज्यात येणार याॅर्क आणि ऑस्ट्रेलिया विद्यापीठ; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती 

अजित पवारांनीआज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. रायगडच्या पालकमंत्रीपदाविषयी विचारले असता ते म्हणाले, पत्रकार मित्रांनो, काही काळजी करू नका. झेडावंदन होतंय आहे, निधी देतोच आहे, डीपीसीचा निधीही रायगडला दिलाय. पालकमंत्रीपद दिलं नाही म्हणून काही अडलं आहे का? सर्व काम होत आहेत, असं म्हणत अजितदादांनी पालकमंत्रीपदाच्या वादावर भाष्य करणं टाळलं.

आदिती तटकरे कार्यक्षम मंत्री आहेत, रायगडच्या पालकमंत्री पदासाठी त्यांचा चेहरा योग्य आहे. रायगडसारख्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गावगुंडाकडे असता काम नये, असं विधान संजय राऊतांनी केलं होतं. याविषयी विचारलं असता कोण काय बोललं याच्याबद्दल मला विचारून नका, असं म्हणत अजितदादांनी राऊतांनी केलेल्या वक्त्व्यावर प्रत्युत्तर देण्याचं टाळलं.

बांधकाम उद्योगात आता बदल घडणार, टाटा ब्लूस्कोप स्टीलने केलं प्रिझ्मा कोटेड स्टील लाँच 

एक रुपयात पिक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला,असं विधान अजितदादांनी केलं होतं. यावरही आता अजितदादांनी स्पष्टीकरण दिलं. पिकविम्यात ज्यांनी चुकीचं केलं आहे, त्यांच्यासाठी मी बोललो होतो. बळीराजाला मी कसं काय बोलू शकतो, मी देखील शेतकरी आहे. काही महाठगांनी चुना लावला म्हणून मी बोललो, असे स्पष्टीकरणही अजितदादांनी दिलंय.

दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरजी अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केलं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार हे मी माध्यमातूनच ऐकतोय. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची तशी भावना स्वाभाविक आहे, असे उत्तर अजित पवारांनी दिले.

 

 

follow us