कृषिमंत्र्यांना पदावरून हटवण्याची तत्परता कधी दाखवणार?, दानवेंचा महायुती सरकारला सवाल

कृषिमंत्र्यांना पदावरून हटवण्याची तत्परता कधी दाखवणार?, दानवेंचा महायुती सरकारला सवाल

Ambadas Danve : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना कोर्टाने कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. मात्र, दोन वर्षांची त्यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर विरोधकांकडून (Mahavikas Aghadi) त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातंय. यावर आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही यावर भाष्य केलं.

पोलिसांचे हात बांधलेले, स्वार्थी सरकार…आकाच्या मांडीला मांडी लावून, आदित्य ठाकरे कोणावर बरसले? 

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाई जगताप, आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना दानवे म्हणाले की, कृषीमंत्र्यांना न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुनिल केदार यांना शिक्षा ठोठावल्यानंतर तात्काळ सदस्यत्व रद्द करण्यासाठी जी तत्परता महायुती सरकारने दाखवली होती, तशी तत्परता विद्यमान कृषी मंत्री यांच्याबाबत का दाखवली नाही? असा सवाल दानवेंनी केला.

Budget Session : चहापानावर मविआचा बहिष्कार, ‘या’ मुद्द्यांवर सरकारला घेरणार, मविआच्या बैठकीत काय ठरलं? 

केदार यांना शिक्षा झाली तेव्हा २४ तासांच्या आत त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. देशात देखील लोकसभेत राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. तसा न्याय कृषीमंत्र्यांना लावायला पाहिजे होतो, मात्र, सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता ते उजळ माथ्याने वावरत आहेत, यातून विरोधातील लोकप्रतिनिधीसाठी असलेला दुजाभाव स्पष्ट दिसून येतो, असं दानवे म्हणाले.

महायुती सरकारमध्ये धमकी देणाऱ्यांना संरक्षण…
पुढं ते म्हणाले की, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषाचा अवमान करण्याची सुरु केलेली प्रथा राज्यात नामांकित व्यक्तींकडून पुढे सुरु असल्याचे दिसून येत आहे. सोलापूरकर यांचे महापुरुषांबाबचे वक्तव्य हे याचाच एक भाग आहे. असे असतानाही सोलापूरकर यांना फिल्मसिटीत त्यांना उच्च पदावर नियुक्त करण्यात आले. प्रशांत कोरटकर यांनी इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमानकारक उल्लेख केला अशा व्यक्तींवर ठोस कारवाई कऱण्याऐवजी त्यांना शासनाकडून संरक्षण दिले जात आहे, असंही दानवे म्हणाले.

गृहराज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही…
स्वारगेट अत्याचार घटनेवर गृहराज्यमंत्री असंवेदनशीलपणे बोलत आहेत. बलात्कार शांततेत पार पडला हे काय वाक्य आहे? असे असंवेदनशील बोलत असतील तर अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, असंही दानवे म्हणाले.

मविआचा चहापानावर बहिष्कार
सरकारकडून विरोधी पक्षाला कायम सापत्न वागणूक मिळत आहे. सरकारकडून संसदीय लोकशाहीचे पालन केले जात नाही. केवळ चहापानाचा फार्स सरकार करतं. पण इतर वेळी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा सरकारच्या कोणत्याही प्रकारे आदर केला जात नाही. सरकारकडून विरोधी पक्षाला सहकार्य मिळत नसल्याने विरोधी पक्ष चहापानावर बहिष्कार घालत आहे, असं दानवे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube