Download App

“ज्यांना अर्थ खात्यावर वॉच ठेवायचाय त्यांनी ठेवावा, त्यांचं..”, गुगली प्रश्नावर अजितदादांचं सेफ उत्तर

ज्यांना कुणाला माझ्या अर्थ खात्यावर वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत.

Ajit Pawar on Eknath Shinde : राज्याच्या राजकारणात आज एक वेगळीच बातमी फुटली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर एक बैठक घेतली. या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी निधीवाटपाच्या मुद्द्यावरुन अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही आक्रमक पवित्रा घेत अर्थखात्यावर वॉच ठेवण्याच्या सूचना आमदार, मंत्र्यांना दिल्या. याच मुद्द्यावर पत्रकारांनी नंतर अजित पवार यांना (Ajit Pawar) विचारलं. तेव्हा अजित पवार सेफ उत्तर देत वेळ मारुन नेली. ज्याला कुणाला वॉच ठेवायचा आहे त्यांनी तो ठेवावा असे उत्तर अजितदादांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांच्या बैठकीबाबत प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, ज्या दिवशी कॅबिनेट बैठक नसते त्या दिवशी आम्ही प्री कॅबिनेट बैठक घेतो. आताच या गोष्टी घडत आहेत असे काही नाही. महाविकास आघाडीच्या वेळी काँग्रेस (Congress Party) आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्री कॅबिनेट बैठक घेत असायचे. आताही महायुतीत राष्ट्रवादी आणि शिवसेना (Eknath Shinde Shivsena) अशा प्रकारच्या बैठका घेतात. त्यात बिघडलं कुठं? बैठकीत चर्चा होते कुणाचं काय म्हणणं आहे ते शिंदे साहेब ऐकून घेतात. आम्ही सुद्धा चर्चा करतो. त्यात काही वेगळी मतं असू शकतात. पण म्हणून त्याला वेगळं स्वरुप देण्याचा प्रयत्न करू नका.

अजितदादांच्या ‘अर्थ’ खात्यावर राहणार शिंदेंच्या शिवसेनेचा वॉच; एकनाथ शिंदेंचे आमदारांना आदेश?

ज्यांना वॉच ठेवायचा त्यांनी जरुर ठेवा

ज्यांना कुणाला माझ्या अर्थ खात्यावर वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत. मी माझं काम करत असतो. त्यामुळे तुम्हाला काय बातम्या पसरवायच्या (प्रसारमाध्यमे) त्या पसरवा. पण त्या बातम्या तथ्यहीन आहेत. त्या बातम्यांत काहीही अर्थ नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

नेमकं काय घडलं?

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर शिवसेनेतील मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्वतः एकनाथ शिंदे हजर होते. उपस्थित मंत्र्यांनी निधी वाटपाचा मुद्दा उपस्थित करत अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त केली. यानंतर अजित पवारांच्या अर्थ खात्यावर बारकाईने नजर ठेवा असे आदेश शिंदे यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

अजित पवार यांच्या खात्यात सध्या 1400-1400 कोटी रुपयांचे दोन निधी आहेत. या निधीवर प्रामुख्याने लक्ष ठेवले पाहिजे. हा निधी नेमका कुठे वितरीत होत आहे याची माहिती आपल्याकडे असायला हवी असे आग्रही मत या बैठकीत मांडण्यात आले. आपल्या हक्काचा जो निधी आहे तो मिळालाच पाहिजे अशी आक्रमक भूमिका एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत घेतल्याची माहिती आहे.

ठाकरेंना धक्का, माजी आमदार महादेव बाबर यांनी हाती बांधले घड्याळ

follow us