Ajit Pawar News : मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, पैसे परत घेणार नाही, अशी सारवासारव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या वादग्रस्त विधानावर केलीयं. ते जळगावमध्ये आयोजित जनसन्मान यात्रेत बोलत होते. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमादरम्यान, रवि राणा यांनी पैसे परत घेणार असल्याचं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय नेत्यांकडून टीकेची झोड उठवण्यात आली. आता अजित पवार यांनीही राणांच्या विधानावर भाष्य करीत पैसे परत घेणार नसल्याचा शब्दच दिलायं.
“CM पदासाठी चेहरा असेल तर जाहीर करा, स्वागत करू”; राऊतांनी काँग्रेसला डिवचलं
अजित पवार म्हणाले, विरोधक टीका करतात त्यांना टीका करु देत, मला काही देणं घेणं नाही. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन योजनांची घोषणा केलेली नाही. गोरगरीब जनता, शेतकऱ्यांसाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. आताच्या सरकारची मुदत संपेपर्यंत महिलांना साधारण साडेसात हजार रुपये तुम्हाला मिळतील. पुढे पाच वर्ष हिशोब केला तर सात महिन्यांचे 90 हजार महिलेला मिळणार आहेत. अर्थसंकल्पादरम्यान घोषणा केली तेव्हाच विरोधकांनी विरोध केला म्हणाले निधी कुठून आणणार पण आपल्या राज्याचं उत्पन्न भरपूर आहे, स्थूल उत्पन्न आपलं 43 लाख रुपये असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलंय.
संजयकाकांच्या राजकारणावर दुसरा घाव? रोहित पाटील ‘तासगाव’साठी तयार!
तसेच सध्या महिलांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येतात त्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणी कहीही खोटं नाटं सांगेन त्याच्यावर विश्वास ठेऊ नका, आम्ही संविधान बदलणार, आरक्षण काढणार, असा नरेटिव्ह सेट करण्याच प्रयत्न झाला. आता हात जोडून विनंती करतो अजितबात त्याच्यावर विश्वास ठेऊ नका, आम्ही कामाची माणसं राजकारण करणारे नाही, असा टोलाही अजित पवार यांनी विरोधकांना लगावलायं.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे जेव्हा सुरु होतील त्यावेळी आम्ही पैसे परत घेऊ अशा बातम्या येतील, पण हे पैसे महिलांसाठीच आहेत. कोणीही काहीही सांगेन, कोणीही काहीही वक्तव्य करतील पण मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, हे पैसे आम्ही परत घेणार नाही, असा शब्दच अजित पवार यांनी दिलायं.
काय म्हणाले होते आमदार रवी राणा?
आमचं सरकार आलं तर आम्ही 1500 रुपयांवरुन 3 हजार रुपये करु, मात्र तुम्हा मला आशिर्वाद नाही दिला तर मीही तुमचा भाऊ आहे, तुमच्या खात्यातून ते पंधराशे रुपये परत घेईन, असं रवि राणांनी लाडक्या बहिणींना उद्देशून म्हटलं होतं. अमरावतीमध्ये आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात राणा बोलत होते.