Download App

राणे धमक्या देतील असं वाटत नाही, त्यांची बोलण्याची पद्धतच…; मालवण राड्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

नारायण राणेंची बोलण्याची पद्धत तशीच आहे. ते नेहमीच आक्रमकपणे बोलतात. ते कोणाला धमक्या वैगरे देतील, असं मला वाटतं नाही- देवेंद्र फडणवीस

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis on Narayan Rane: राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला. यावरून चांगलच राजकारण तापलं. दरम्यान, आज आदित्य ठाकरे किल्ल्यावर गेले असता नारायण राणे (Narayan Rane) आणि आदित्य ठाकरे शिवाजी महाराजांचा  (Aditya Thackeray) समोरासमोर आल्यानं दोन्ही गटात राडा झाला. यावेळी राणेंनी घरातून खेचून एकेकाला मारुन टाकेन, अशी दिली. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

हरियाणात एमपी अन् राजस्थानचा डाव, भाजपाचे खासदार पुन्हा मैदानात; प्लॅनिंग काय? 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राजकोट किल्ल्यावरील राड्याविषयी विचारले असता ते म्हणाले, कोणी काय केले त्यावर आज बोलणार नाही. पण माझी सर्वांना विनंती आहे की, कोणी या विषयात राजकारण करू नये. राणेंनी पत्रकार आणि पोलिसांना धमक्या दिल्या, असाही प्रश्न फडणवीसांना विचारला असता ते म्हणाले की, नारायण राणेंची बोलण्याची पद्धत तशीच आहे. ते नेहमीच आक्रमकपणे बोलतात. ते कोणाला धमक्या वैगरे देतील, असं मला वाटतं नाही, असं फडणवीस म्हणाले.

“बस, आता खूप झालं, मी निराश अन् भयभीतही..” कोलकाता घटनेवर राष्ट्रपतीही उद्विग्न 

पवारांनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता फडणवीस म्हणाले, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना हे माहित आहे की, हा पुतळा नेव्हीने तयार केलाय. हा पुतळा राज्य सरकारने तयार केला नाही. एखाद्या ठिकाणी भ्रष्टाराचाराचे तारतम्य, अन् दुसरीकडे नाही, असं कसं म्हणता येईल. भ्रष्टाचार कुठंच व्हायला नको. भ्रष्टाराचाला आपला विरोधच असायला हवा. पवार साहेबांचाही भ्रष्टाचाराला विरोधच हवा. ते असं वक्तव्य करत असतील तर ते भ्रष्टाचाराला समर्थने देतात का? असं फडणवीस म्हणाले.

पुढं ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून कोणीही राजकारण करू नये. महाराजांचा पुतळा कोसळला ही घटना दु:खद आहे. अशा प्रकारच्या घटनांची योग्य चौकशी झाली पाहजे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. तिथे भव्य पुतळा उभारला गेला पाहिजे. नेव्हीने ही गोष्ट गांभीर्याने घेत चौकशी समिती तयार केली. नेव्ही या संदर्भात चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्याविरोधात कारवाई करेल, असं फडणवीस म्हणाले.

महाराजांचा पुतळा कोसळण्यामागे नेमकी कोणती घटना जबाबदार होती? त्यात काय चुका राहिल्या, या संदर्भातला अहवाल नेव्ही देणारेय. सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिसात एफआयआर दाखल केला असून नेव्हीच्या अहवालानंतर पोलीस पुढील कारवाई करतील, असंही फडणवीस म्हणाले.

खालचं राजकारण करू नका…
मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं की, नेव्हीला मदत करून शिवरायांचा पुतळा उभारणार आहोत. जे जे करणं आवश्यक आहे, ते केलं जातंय. मात्र, केवळ राजकारण करायचं हे विरोधकांचं जे काही सुरू आहे, ते चुकीचं आहे. विरोधकांनी खालचं राजकारण करू नये, असं फडणवीस म्हणाले.

follow us