आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून रणशिंग फुंकण्यात आल्याचं दिसून येत आहे. ठाण्यात आज भाजपची महाविजय कार्यशाळा 2024 पार पडली. यावेळी राज्यातील भाजपच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, या कार्यशाळेत देवेंद्र फडणवीसांनी संबोधन केलं आहे.
अधर्म नाही ही तर कुटनीती; सध्याच्या राजकारणावर फडणवीसांनी दिलं महाभारतातील कर्णाचं उदाहरण
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. 2019 साली शिवसेनेशी तुटलेली युती ते मेहबूबा मुक्ती यांच्यासोबत का जावं लागलं होतं, याबद्दल त्यांनी सडेतोडपणे भाष्य केलं आहे. 2019 साली उद्धव ठाकरेंनीच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असून देवेंद्र अवमान सहन करु शकतो पण बेईमानी सहन करु शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Double iSmart: ‘लाइगर’ नंतर पुरी जगन्नाथ घेऊन आले; आयस्मार्ट शंकरचा सिक्वल, मुंबईत शूटिंग सुरू…
पुढे बोलताना ते म्हणाले, मेहबूबा मुक्ती यांच्याशी युती केली तेव्हा जगभरात भारतात लोकशाही नसल्याची टीका केली जात होती. पाकिस्तानने तसा आरोप केला होता. त्यामुळे आपल्याला कधीकाळी मेहबूबा मुक्ती यांच्यासोबतही जावं लागलं होतं. त्यावरुन काही लोकांनी टीका केली पण ती त्यावेळची आवश्यकता होती, असं ते म्हणाले आहेत.
माजी खासदार विजय दर्डांसह सुपुत्राला धक्का; कोळसा खाणवाटप गैरव्यवहारात 6 जण दोषी
तसेच कलम ३७० हटवणे आपले ध्येय होते. त्यानंतर त्या पक्षाला लाथ मारून बाहेर येण्याचं काम भाजपने केले. आता पाकव्यात काश्मिर भारतात आणायचे आहे त्यासाठी आपण काम करत आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. नेहमी विचार दूरचा करायाचा असतो, त्यासाठी संयम आणि विश्वास आवश्यक आहे. पक्ष आणि नेतृत्वावर विश्वास असल्याने भाजप उभी राहिली आहे. आता आपल्याला विष पचवायचं नाही, पण महाविजयासाठी कडू औषध जरी घ्यायची गरज पडली तर घ्यावं लागेल, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
अनेकवेळा उपहास अन्याय पचवला आहे. लोकसभेत २ सदस्य निवडून आल्याने भाजपला चिडवलं होतं. आता भाजपचे सर्वाधिक खासदार आहेत. सरकारमध्ये आपल्याला आता नवीन सहकारी मिळाला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, भाजपने २०२४ निवडणुकांसाठी तयारी सुरू केली असून त्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.