अधर्म नाही ही तर कुटनीती; सध्याच्या राजकारणावर फडणवीसांनी दिलं महाभारतातील कर्णाचं उदाहरण
Devendra Fadnavis : भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीमधील भाजप मेळाव्यात उद्धव ठाकरे(uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मेळाव्यात सांगितले की, आपण जे करत आहोत तो अधर्म नसून धर्मच आहे, याला कुटनीती म्हणतात, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले की, शिवसेना(Shiv Sena) आणि राष्ट्रवादी(NCP) फोडण्यावरुन आपल्यावर टीका होत आहे. त्यावर फडणवीसांनी सांगितले की, आपण जे करत आहोत त्याला कुटनीती म्हणतात.(Devendra fadnavis criticise on uddhav Thackeray bjp we are doing not adharma example of mahabharata karn)
राष्ट्रवादीबरोबर आमची राजकीय मैत्री, पुढच्या १०-१५ वर्षांत…; फडणवीस आता स्पष्टच बोलले
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदींचे फोटो लावून शिवेसेनेनं मतं मागितली. अन् निवडणुका झाल्यावर पाठित खंजीर खुपसला. हा खंजीर देवेंद्र फडणवीसांच्या पाठित नाहीतर तो भाजपच्या पाठित खुपसला असंही यावेळी फडणवीस म्हणाले. खऱ्या अर्थानं याचं उत्तर देणंही गरजेचं होतं.
पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजप नेत्याचा मृत्यू; फडणवीसांचा नितीशकुमार सरकारवर हल्लाबोल
मला एक गोष्ट आठवते, अमित शाहा म्हणाले होते की, देवेंद्र दहावेळा अपमान सहन करा पण बेईमानी सहन करु नका, राजकारणात जो बेईमानी सहन करेल तो राजकारणात कधी टिकत नाही. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी केलेली ही दगाबाजी होती. असंख्य कार्यकर्त्यांच्या समर्पनाशी दगाबाजी होती, त्यागाशी दगाबाजी होती. ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष जिंकण्यासाठी आपला घाम गाळला.
त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये भाजपचा कार्यकर्ता प्रामाणिकपणे उद्धव ठाकरेंचे उमेदवार निवडूण येण्यासाठी म्हणून काम करत होता, त्यांच्याशी देखील ही बेईमानी होती. म्हणून खऱ्या अर्थाने मला एकच गोष्ट सांगायचंय की, आज आपण जे करतोय तो धर्म आहे अधर्म नाही. तुमच्या मनामध्ये याबद्दल शंका असू देऊ नका, आपल्याला महाभारताने हेच शिकवलं आहे. कर्णाचे कवचकुंडलं काढून घेतल्याशिवाय कर्णावर विजय मिळवता येणार नाही, हे श्रीकृष्णाला माहिती होतं.
भीष्माला पराभूत करण्यासाठी शिखंडीला उतरवले. सूर्यास्त भासवला, द्रोणाचार्यांना जेव्हा अश्वत्थामा गेला असे सांगायचे होते, तेव्हा नरोवा कुंजरोवा हे सांगताना श्रीकृष्णाने एवढ्या जोरात शंख वाजविला की, फक्त अश्वत्थामा गेला एवढेच ऐकायला गेले. हा अधर्म नाही ही कूटनीती आहे. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा तेव्हा कूटनीती वापरावी लागेलच, असेही देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितले आहे. .
आपल्या पक्षामध्ये आपण नैतिकता शिकतो. लोकं म्हणतात, तुम्ही दोन दोन पक्ष फोडले. कोणी म्हणतं तुम्ही घरं फोडलं, त्यावर फडणवीस म्हणाले की, पहिल्यांदा तर मला हे विचारायचंय की सुरुवात कोणी केली? 2019 मध्ये जनादेशाची हत्या कोणी केली? जे असं म्हणतात की, तुम्ही पक्ष फोडले त्यावर फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे काय छोटे नेते आहेत का? ते विचारपूर्वक आले आहेत.
हे विचारपू्र्वक आले आहेत. ज्या-ज्यावेळी अन्याय होईल त्या-त्या वेळी एकनाथ शिंदे जन्माला येईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचवेळी शिवसेनेशी आमची इमोशनल मैत्री आहे आणि काल परवा राष्ट्रवादीशी केलेली पॉलिटीकल मैत्री आहे, कदाचित पुढील दहा पंधरा वर्षात तीही आमची इमोशनल मैत्री होईल याबाबत आमच्या मनात शंका नाही असंही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.