पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजप नेत्याचा मृत्यू; फडणवीसांचा नितीशकुमार सरकारवर हल्लाबोल
Devendra Fadnavis On Nitish Kumar : बिहारमध्ये(bihar) शिक्षक भरती नियमातील बदलांच्या निषेधार्थ आणि शिक्षकांच्या मागणीसाठी भाजपने विधानसभेवर मोर्चा काढला. त्यावेळी भाजप(BJP) कार्यकर्त्यांशी पोलिसांची झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात भाजपच्या एका नेत्याचा मृत्यू झाला. या घटनेवरुन भाजप नेत्यांनी बिहार सरकारवर(Bihar Govt) जोरदार निशाणा साधला आहे. त्यातच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी देखील भाजप नेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत बिहार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.(Devendra Fadnavis criticise on nitish kumar govt BJP leader dies in police lathi charge bihar)
घरे बुडाली, व्हीआयपी भागातही साचले पाणी… पाहा पूरग्रस्त दिल्लीचे भयानक फोटो
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे बिहार सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, बिहार सरकारने केलेल्या निर्दयी लाठीचार्जमध्ये आमच्या एका कॉम्रेडचा मृत्यू झाल्याने खूप दुःख झाले.
जयंत पाटील पवारांची साथ सोडणार? अजितदादांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर म्हणाले…
ज्या भूमीतून लोकशाहीचा आवाज बुलंद झाला, त्या भूमीवरील या दडपशाही धोरणाचा मी तीव्र निषेध करतो. बिहार सरकार आपले अपयश लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न करु शकते, मात्र भाजप आपला संघर्ष सुरुच ठेवणार, असा इशाराही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
बिहार में राज्य सरकार द्वारा निर्मम लाठीचार्ज में हमारे एक साथी की मृत्यु से बेहद आहत हूँ।
जिस धरती से लोकतंत्र की आवाज बुलंद हुई, उसी धरती पर इस दमनकारी नीति की मैं कठोर निंदा करता हूँ।
बिहार सरकार अपनी नाकामी को छुपाने की लाख कोशिश कर ले, भाजपा अपना संघर्ष जारी रखेगी !…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 13, 2023
बिहारमधील जहानाबाद शहरातील झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजपचे सरचिटणीस विजयकुमार सिंह यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये विजय जखमी झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर बिहारमधील राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देखील बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारवर ट्वीट करुन निशाणा साधला आहे. अनेक भाजप नेत्यांनीही देखील बिहार सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यातच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नितीश कुमार यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.