जयंत पाटील पवारांची साथ सोडणार? अजितदादांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर म्हणाले…

जयंत पाटील पवारांची साथ सोडणार? अजितदादांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. जयंत पाटील यांना सोबत घेण्याच्या इराद्याने अजित पवार यांचा गट कामाला लागला आहे. याबाबत प्राथमिक चर्चाही झाली असल्याचे वृत्त लोकमत या वृत्तपत्राने ऑनलाईन स्वरुपात प्रसिद्ध केलं आहे. (NCP Leader Jayant Patil refuse news to joining Ajit Pawar’s group)

मात्र या बातमीत कोणतेही तथ्य नसून मी शरद पवार यांच्यासोबतच असल्याचा खुलासा स्वतः जयंत पाटील यांना ट्विटच्या माध्यमातून केला आहे. जयंत पाटील म्हणाले, दैनिक लोकमतने ऑनलाईन प्रसिद्धीस दिलेली बातमी माझ्या वाचनात आली. बातमीत दिल्याप्रमाणे कोणतेही तथ्य नसून मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या सोबतच आहे. पवार साहेबांच्या सोबत असणारे आम्ही सर्व आमदार साहेबांच्या विचारधारेवर ठाम आहोत, असा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे.

काय म्हंटलं होतं बातमीत?

जयंत पाटील यांना सोबत घेण्याच्या इराद्याने अजित पवार यांचा गट कामाला लागला आहे. यासंदर्भात प्राथमिक चर्चाही झाली आहे. पाटील यांनी या चर्चां आणि हालचालींना अद्याप अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. शरद पवार यांच्या सोबतच राहण्याची भूमिका ते घेत आहेत. तरीही त्यांचे मन वळविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे, असे या बातमीत म्हटलं होतं.

48 वर्षांपूर्वी अजितदादा ठरले होते ‘टॉमेटो किंग’; जिल्ह्यात मिळाला होता विक्रमी भाव

जयंत पाटील मागील काही दिवसांपासून माध्यमांपासून लांब आहेत. ते दिल्लीतील राष्ट्रवादीच्या बैठकीतही दिसले नव्हते. त्यानंतर झालेल्या येवला येथील सभेलाही त्यांची अनुपस्थित होती. त्यामुळे जयंत पाटील अजित पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या चर्चांचं त्यांनी खंडन केलं असून आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube