घरे बुडाली, व्हीआयपी भागातही साचले पाणी… पाहा पूरग्रस्त दिल्लीचे भयानक फोटो

1 / 9

देशाची राजधानी दिल्लीत पावसामुळं यमुनेच्या पाण्याची पातळी सतत वाढत आहे. ही पातळी 208 मीटरच्या पुढे गेली आहे. पुरस्थिती पाहता दिल्ली सरकार सतर्क आहे. दरम्यान, यापूर्वी 1978 मध्ये प्रथमच लोखंडी पुलाजवळील पाण्याची पातळी 207.49 मीटर नोंदवण्यात आली होती.

2 / 9

यमुना नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढल्यास दिल्लीसाठी मोठे संकट उभे राहू शकते. यमुनेचे पाणी घुसल्याने दिल्लीतील 3 वॉटर प्लांट बंद करण्यात आले आहेत.

3 / 9

पुराचे पाणी व्हीआयपी भागात आणि सिव्हिल लाइन्स परिसरात पोहोचले. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानही याच भागात आहे. यमुनेच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली नाही, तर पुराचे पाणी सिव्हिल लाईन्स परिसरात असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात शिरू शकते.

4 / 9

सध्या रिंगरोडपर्यंत पाणी पोहोचले आहे. काश्मिरे गेट बसस्थानकही धोकादायक स्थितीत आहे. राजघाट, आयटीओ, पुराणा किला परिसर जलमय झाला आहे.

5 / 9

लाल किल्ल्याबाहेर गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचले. याशिवाय, मठ, यमुना बाजार, यमुना खादर, मजनू का टिळा आणि यमुना बँक मेट्रो स्टेशनच्या बाहेर पुराचे पाणी पोहोचले आहे.

6 / 9

वजिराबाद जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरल्याने प्लांट बंद करावा लागला आहे. यमुना पुराच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे पथकाकडून पूरग्रस्त भागातील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. लोकांना घरे सोडावी लागली आहेत, पाणी रस्त्यांकडे आल्याने अनेक रस्ते बंद झाले आहेत.

7 / 9

यमुना बँक मेट्रो स्टेशनच्या बाहेर पाणी तुंबले आहे. प्रवेश आणि बाहेर पडण्याचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मात्र, इंटरचेंजची सुविधा अजूनही उपलब्ध आहे. ब्लू लाईनवरील सेवा सामान्यपणे चालू आहेत. लक्ष्मी नगर किंवा अक्षरधाम मेट्रो स्टेशनवरून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

8 / 9

कश्मिरी गेटच्या आजूबाजूला बांधलेल्या व्यावसायिक प्रतिष्ठानांनाही रविवारपर्यंत बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यमुनेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे खबरदारी म्हणून नदीवर बांधलेल्या चारही मेट्रो पुलांवरून ताशी 30 किमी वेगाने गाड्या जात आहेत.

9 / 9

1900 नंतर दिल्लीत अनेक मोठे पूर आले. 1924, 1947, 1976, 1978, 1988, 1995, 2010, 2013 मध्ये दिल्लीतील सर्व भाग पुराच्या पाण्याने भरले होते. आता 2023 मध्ये यमुनेच्या पाण्याच्या पातळीने 1978 चा विक्रम मोडला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube