Devendra Fadnvis Speak On Nana Patole Accident : आम्ही वेगवेगळ्या पक्षात आहोत पण एकमेकांचे शत्रू नाहीत, नाना पटोले (Nana Patole) असं म्हणतील मला वाटत नसल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी नाना पटोलेंच्या आरोपांवर केलं आहे. दरम्यान, नाना पटोले निवडणुकीच्या प्रचारावरुन येत असताना भरधाव वेगातील ट्रकने नाना पटोले यांच्या गाडीला जोरात धडक दिली आहे. या अपघातात नाना पटोले बचावले आहेत. या अपघातावरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप केले जात आहेत. त्यावर फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
रात्री साडेबारा वाजता शिवतारेंना फोन,अजित पवार म्हणाले, हृदयात कुठेतरी दुखतं …
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला वाटत नाही नाना पटोले असं म्हणतील. मी त्यांची विचारपूस केली, त्यांना फोन केला. आम्ही वेगळ्या पक्षात आहोत पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत. नाना पटोले आमचे मित्र असून आमच्यात वैचारीक सामना सातत्याने चालू असतो. जसं समजलं तसा मी नानांना फोन केला. नानांनी सांगितलं की, मोठा अपघात झाला असून मी थोडक्यात बचावलो आहे. राज्याच्या राजकारणात अशी परिस्थिती न उद्भवली न उद्भभवणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
राज्यात मुसळधार पाऊस, उष्णतेपासून मिळणार दिलासा, वाचा नवीन हवामान अंदाज
नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून नाना पटोले निवडणुकीच्या प्रचारातून परतत असताना त्यांच्या कारला भरधाव वेगातील ट्रकने पाठीमागील बाजूने जोरात धडक दिली. सुदैवाने या अपघातात नाना पटोले थोडक्यात बचावले. भंडारा शहराजवळ असणाऱ्या भीलवाडा गावानजीक ही घटना घडली. या अपघातात पटोले यांच्या वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मात्र ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे.
लोकसभेला पाठिंबा देऊन राज ठाकरे महायुतीकडून काय-काय मिळविणार?
यासंदर्भात लोंढे यांनी ट्विट केले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का? नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादान नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत, असे लोंढे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.