Jayant Patil On Devendra Fadnvis : सध्या विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. अशातच राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने मोठा गदारोळ पाहायला मिळाला. त्यानंतर नवाब मलिकांना महायुतीत घेता येणार नसल्याचं पत्रच देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) लिहिलं. त्यावरुन शरद पवार पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी टोलेबाजी लगावलीयं.
रायगड जिल्ह्यात अंमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर छापा, 106 कोटींचं ड्रग्ज जप्त
जयंत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना पत्र लिहिलं हा आश्चर्याचा भाग आहे. फोन करुन सांगितलं असतं तर बर झालं असतं. फडणवीसांनी जे पत्र लिहिलंय ते लोकांसाठी आहे, आम्ही यातले नाहीत असं दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच काही गोष्टी कितीही नाही म्हटलं तरीही अंगाला चिकटतात, अशी खरमरीत टीकाही जयंत पाटील यांनी केलीयं.
World Cup Final Pitch : खराब खेळपट्टीमुळं वर्ल्डकप गमावला? ICC ने केला मोठा खुलासा
मलिकांची भूमिका माहित नाही पण..,
नवाब मलिक यांची भेट घेतली. नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसले आहेत. त्यांना सत्ताधारी बाकाची जागा निश्चित करुन दिली असल्याची माहिती माझ्याकडे आहे. नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसलेत पण त्यांची भूमिका काय हे माहित नसून मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
सत्ताधाऱ्यांना भरघोस निधी :
अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. मात्र, सत्ताधारी आमदारांनाच भरघोस निधी दिला जात असल्याची अनिष्ठ प्रथा सुरु झाली आहे. विरोधक आमदारांनी निधी दिला जात नसल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला आहे.
नवाब मलिक सध्या जामिनावर बाहेर आहेत. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित सलीम पटेल आणि हसिना पारकर यांच्यासह गोवाला कंपाऊंड जमीन व्यवहारात घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. शिवाय देशद्रोहाचाही आरोप त्यांच्यावर आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर ते आज पहिल्यांदाच राज्याच्या राजकारणात सक्रिय दिसले. ते आज हिवाळी अधिवेशनातही सहभागी झाले होते.
राष्ट्रवादीतील बंडानंतर ते मलिक कोणत्या गटात सामील होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, आज सभागृहात जाताच ते सत्ताधारी बाकावर बसले. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार पाहून विरोधकांनी गोंधळ केला आणि मलिकांबाबत काही सवाल केले. विधिमंडळात जोरदार खडाजंगी झाली. आता देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवारांना पत्र लिहिलं.