World Cup Final Pitch : खराब खेळपट्टीमुळं वर्ल्डकप गमावला? ICC ने केला मोठा खुलासा

World Cup Final Pitch : खराब खेळपट्टीमुळं वर्ल्डकप गमावला? ICC ने केला मोठा खुलासा

World Cup Final Pitch : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्यांसाठी (World Cup Final Pitch) नुकतीच रेटिंग जारी केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरचा सामना (World Cup Final) ज्या खेळपट्टीवर खेळवण्यात आला त्यालाही सरासरी रेटिंग दिली गेली आहे. यंदाचा विश्वचषक भारतात आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेतील अखेरचा सामना अहमदाबाद शहरातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने टीम इंडियाचा दणदणीत (IND vs AUS Final) पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं.

या सामन्यासाठी खेळपट्टी अतिशय संथ होती त्यामुळे यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता या खेळपट्टीला आयसीसीने सरासरी रेटिंग दिले आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळपट्टी अतिशय संथ होती. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 240 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळवला. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ज्या मैदानानवर सेमी फायनलचा सामना झाला त्यालाही आयसीसीने सरासरी रेटिंग दिले.

World Cup विजयानंतर कांगारुंचा विजयी उन्माद! पायाखाली ट्रॉफी घेत मिचेल मार्शचे फोटोसेशन

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, आयसीसी मॅच रेफरी अँडी पायक्राफ्ट विश्वचषक 2023 फायनल सामन्याच्या खेळपट्टीला रेटिंग दिले आहे. तर जवागल श्रीनाथ यांनी ऑस्ट्रेलिया-साउथ आफ्रिका यांच्यातीस सेमी फायनलच्या खेळपट्टीला रेटिंग दिले. या व्यतिरिक्त भारत आणि न्यूझीलँड यांच्यातील पहिल्या सेमी फायनल सामन्यातील वानखेडे खेळपट्टीला चांगली रेटिंग मिळाली. या खेळपट्टीवरूनही मोठा वाद झाला होता. त्यामुळे ऐनवेळी खेळपट्टी बदलण्यात आली होती आणि जुन्याच खेळपट्टीवर सामना झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने 4 विकेटच्या मोबदल्यात 397 धावा केल्या होत्या. यानंतर न्यूझीलँडनेही जबरदस्त टक्कर दिली. मात्र त्यांना हा सामना जिंकता आला नाही.

ऑस्ट्रेलियाच्या उत्कृष्ट गोलंदाजांने भारताला 240 धावांत गुंडाळले. राहुल (107 चेंडूत 66 धावा, एक चौकार) आणि कोहली (63 चेंडूत 54 धावा) यांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी करून भारताला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरले. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी नियमितपणे भारताला धक्के दिले. यामुळे भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करता आली नाही. अखेरीस 50 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर संपूर्ण टीम विश्वचषकात प्रथमच ऑलआऊट झाली. त्यानंतर सुरुवाचे तीन धक्के ऑस्ट्रेलियाला लागोपाठ बसले. पण प्रेशर न येऊ देता खेळत ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप उंचावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube