IND vs AUS 5th T20I : पाचव्या सामन्यात टीम इंडियात होणार बदल; ‘या’ खेळाडूंची होणार एन्ट्री

IND vs AUS 5th T20I : पाचव्या सामन्यात टीम इंडियात होणार बदल; ‘या’ खेळाडूंची होणार एन्ट्री

IND vs AUS 5th T20I : पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना जिंकत टीम इंडियाने (India vs Australia) मालिकाही खिशात टाकली. विश्वचषक गमावल्याच्या दुःखातून सावरण्याचे बळ या मालिका विजयाने मिळाले. त्यानंतर आता पाचवा अन् शेवटचा सामना (IND vs AUS 5th T20I) फक्त औपचारिकतेचाच राहणार आहे. या सामन्यात टीम इंडियात काही महत्वाचे बदल होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. मागील चार सामन्यात संघात बदल करण्यात आले होते. तसाच बदल या सामन्यातही होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंगला (Rinku Singh) विश्रांती देऊन शिवम दुबेला संधी दिली जाऊ शकते.

IND vs AUS 3rd T20I : टीम इंडियाचं कुठं चुकलं? सुर्यकुमारने केला मोठा खुलासा 

या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड ही जोडी डावाची सुरुवात करताना दिसेल. या दोघांनीही संपूर्ण मालिकेत चांगले प्रदर्शन केले आहे. या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर येऊ शकतो. या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून जितेश शर्माला संधी दिली जाऊ शकते. अष्टपैलू खेळाडू म्हणून वॉशिंग्टन सुंदर किंवा अक्षर पटेल यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. फिरकी गोलंदाज म्हणून रवी बिश्नोईला संधी मिळू शकते. तर वेगवान गोलंदाज म्हणून दीपक चहर, आवेश खान आणि मुकेश कुमार यांना संधी मिळू शकते.

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज रोहित शर्मा आहे. त्याने आतापर्यंत चार शतके ठोकली आहेत. कालच्या सामन्यात त्याच्या याच विक्रमाची बरोबरी मॅक्सवेलने केली. आता आणखी एक शतक केले की तो रोहितच्या पुढे निघून जाईल. मॅक्सवेलचे हे भारताविरुद्ध टी 20 मधील दुसरे शतक आहे. याआधी 2019 मध्ये बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात मॅक्सवेलने शतक केले होते. या सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पराभव पण, दणका पाकिस्तानला! टीम इंडियाला मिळाला पहिला नंबर

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube