IND vs AUS 4th T20I : चौथ्या सामन्यात टीम इंडियात मोठा चेंज; या खेळाडूंची होणार एन्ट्री!

IND vs AUS 4th T20I : चौथ्या सामन्यात टीम इंडियात मोठा चेंज; या खेळाडूंची होणार एन्ट्री!

IND vs AUS 4th T20I : पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत सुरुवातीचे दोन सामने जिंकत टीम इंडियाने (IND vs AUS 4th T2oI) आघाडी घेतली आहे. तर तिसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिका विजयापासून (India vs Australia) भारताला रोखले आहे. आता या मालिकेतील चौथा टी 20 सामना आज (1 डिसेंबर) जयपूर येथे होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात काही बदल पहायला मिळू शकतात. शेवटच्या दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यरचं (Shreyas Iyer) संघात पुनरागमन झालं आहे. त्यामुळे तिलक वर्माला संघाबाहेर केलं जाऊ शकतं. कारण, तिलकने अजूनही या मालिकेत चांगली कामगिरी केलेली नाही. इतर फलंदाजांनी मात्र चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर चौथ्या सामन्यासाठी निश्चित झाला तर तिलक वर्माला वगळणं जाणं जवळपास निश्चित आहे.

भारतीय संघाच्या गोलंदाजीतही काही बदल होतील अशी शक्यता आहे. पहिल्या दोन सामन्यात मुकेश कुमार (Mukesh Kumar) संघात होता. तिसऱ्या सामन्यात तो उपलब्ध नव्हता. त्याच्या जागी आवेश खानला संधी देण्यात आली होती. आता मात्र मुकेश कुमार परतला आहे. त्यामुळे त्याला चौथ्या सामन्यात संधी मिळू शकते. आवेश खानने चांगली गोलंदाजी केली तर प्रसिद्ध कृष्णा मात्र अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्या जागी मुकेश कुमारला संधी मिळू शकते.

IND vs AUS 4th T20I : चौथ्या सामन्यात श्रेयस अय्यरचं कमबॅक; कुणाचा पत्ता होणार कट ?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना आज होणार आहे. उद्याचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा राहणार आहे. हा सामना जिंकून मालिका विजयाचे भारताचे लक्ष्य राहणार आहे. तर दुसरीकडे सामना जिंकून ऑस्ट्रेलिया मालिकेत बरोबरी करण्याची संधी सोडणार नाही. आता संघात ग्लेन मॅक्सवेल परतला आहे. त्यामुळे भारतासाठी पुढील सामने जास्त आव्हानात्मक राहणार आहेत. कारण तिसरा टी 20 सामना मॅक्सवेलनेच हिसकावून नेला होता.

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज रोहित शर्मा आहे. त्याने आतापर्यंत चार शतके ठोकली आहेत. कालच्या सामन्यात त्याच्या याच विक्रमाची बरोबरी मॅक्सवेलने केली. आता आणखी एक शतक केले की तो रोहितच्या पुढे निघून जाईल. मॅक्सवेलचे हे भारताविरुद्ध टी 20 मधील दुसरे शतक आहे. याआधी 2019 मध्ये बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात मॅक्सवेलने शतक केले होते. या सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube