Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत शिवसेनामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे यांच्या या निर्णयामुळे तेव्हा राज्यात अस्तित्वात असणारी महाविकास आघाडी (MVA) सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असा दावा शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी माध्यमांशी बोलताना केला.
माध्यमांशी बोलताना दिपक केसरकर म्हणाले की, जेव्हा पक्षात मतभेद झाले होते तेव्हा पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर शिंदेंना दिली होती. मात्र पुन्हा युतीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली होती मात्र उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांची मागणी मान्य न केल्याने एकनाथ शिंदे यांनी पुढचं पाऊल उचललं असा दावा केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना केला.
पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी होतं ते खूप भावनाप्रधान आहेत. कोणी असं म्हणण्याचं कारण नाही, की एवढा मोठा मनुष्य एखाद्या पदासाठी एवढा मोठा निर्णय घेऊ शकतो. जेव्हा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली तेव्हा ते म्हणाले की, तुम्हीच मुख्यमंत्री राहा पण ज्या विचारधारेसाठी महाराष्ट्रातील जनतेनं आपल्याला निवडून दिलं आहे, त्या जनतेच्या मताचा आदर करा, तुम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये युतीची स्थपाना करा आणि याला जेव्हा उद्धव ठाकरे यांनी नकार दिला, तेव्हा पुढचं पाऊल उचललं गेलं असा दावा दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना केला.
Waqf Board Bill : शिर्डी, तिरुपती बोर्डावर आम्हाला घेणार का? वक्फ बोर्ड बिलावर जलील संतापले
तसेच त्यांनी यावेळी वक्फ बोर्डवरुन उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत जोरदार टीका केली आहे. यावेळी केसरकर म्हणाले की, आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही कोणत्याही धर्मात भेदभाव करत नाही. मोठी मालमत्ता असते तेव्हा त्यांचे परफेक्ट मॅनेजमेंट झाल पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी फतवे निघाले. अशी टीका त्यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर केली.