Download App

Deepak Kesarkar जे-जे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेत… त्यांना व्हिप पाळावाच लागणार

  • Written By: Last Updated:

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले (BHarat Goagavle) यांनी व्हिप बजावला तर जे-जे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांना हा व्हिप पाळावा लागणार आहे. ज्यांनी पाळला नाही तर त्याच्यावर कायद्याने कारवाई होईल. त्यांना चुकीचं वाटतं असेल तर त्यांनी न्यायालयात जावे. संजय राऊत अनेक वेळा म्हटले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा मी एकनिष्ठ आहे. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल राऊत यांना कोणतीही निष्ठा नाही. दोन हजार कोटींच जे बोलतायत त्यांच्या विरोधात कोर्टात गेलं पाहिजे. याबाबतचं माझं मत आज राष्ट्रीय कार्यकारणीत मी मांडणार आहे. त्यात अनेक ठराव आणि बदल केले जातील. मी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार आहे, असे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले आहे.

दिपक केसरकर म्हणतात की, संजय राऊत जामीनावर सुटून आल्यापासून बेजबाबदारपणे बोलत आहेत. जामीन मिळताना काही अटी त्यांना टाकल्या होत्या. त्याचे उल्लंघण ते सातत्याने करत असल्याने त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी आम्ही ईडी, कोर्टाला विनंती करणार आहोत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जातील. धनुष्यबाण आणि राम एक नात आहे, याचं पावित्र्य आम्ही राखू. अयोध्या येथे योगी सरकारकडून महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा दिली जात आहे, त्यामुळे सध्या दौरा थांबवला आहे. परंतु, लवकरच या दौऱ्याची घोषणा करणार आहे, असे दिपक केसरकर यावेळी म्हणाले.

Tags

follow us