डिलिमिटेशन विधेयक लोकशाहीसाठी मोठा धोका; मोदी सरकारला संपूर्ण सत्ता हवीय, मल्लिकार्जुन खर्गेंचा आरोप

Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशन (Delimitation) विधेयकावरून इंडिया आघाडीने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशन (Delimitation) विधेयकावरून इंडिया आघाडीने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशन (Delimitation) विधेयकावरून इंडिया आघाडीने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशन (Delimitation) विधेयकावरून इंडिया आघाडीने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारने आणलेले विधेयक लोकशाहीसाठी मोठा धोका असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. 850 जागा वाढवून संपूर्ण सत्ता स्वतःच्या हातात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा दावाही त्यांनी केला.

डिलिमेटेशनवरून आघाडीत नाराजी? लंके म्हणाले, चुकीच्या पोस्ट करू नका…

इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना खर्गे म्हणाले की, या विधेयकात अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींच्या (ST) हिताचा विचार करण्यात आलेला नाही. या समाजांची लोकसंख्या वाढली असून, त्यानुसार विधेयकात तरतूद केली पाहिजे. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

डिलिमिटेशनची जबाबदारी निवडणूक आयोगावर सोपवली जात असल्याबद्दलही खर्गे यांनी आक्षेप घेतला. एसआयआर (SIR) प्रक्रियेत 10 कोटींपेक्षा अधिक मतदारांना मतदार यादीतून बाहेर काढण्यात आल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ज्ञानेश कुमार यांच्यावरच डिलिमिटेशनची जबाबदारी सोपवली जात असल्याने या प्रक्रियेत आणखी गोलमाल होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.

‘किंग’च्या ‘डॅडी कूल’मध्ये शाहरुख-करीनाचा जबरदस्त स्वॅग, 15 वर्षांनंतर पुन्हा पाहायला मिळाली दोघांची शानदार केमिस्ट्री!

आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये डिलिमिटेशन कशा पद्धतीने करण्यात आले, हे आम्ही पाहिले आहे. सरकारच्या हातात संपूर्ण सत्ता गेली, तर ते संविधानही बदलून टाकतील, असा आरोपही खर्गे यांनी केला.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी डिलिमिटेशन विधेयकावर काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version